Dr.Narendra Dabholkar Marathi Kavita | Dabholkar kavita

डॉ.नरेंद्र दाभोलकर याच्यावर आधारित मराठी कविता 

डॉ.नरेंद्र दाभोलकर | मराठी कविता वाचन | डॉ.नरेंद्र दाभोलकर याच्यावर आधारित मराठी कविता | मराठी कविता
Dr. Narendra Dabholkar marathi kavita


कवितेबद्दल :


डॉ.नरेंद्र दाभोलकर (१ नोव्हेंबर १९४५ – २० ऑगस्ट २०१३) अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष

डॉ.नरेंद्र दाभोलकर याच्यावर आधारित ही एक मराठी कविता आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर हे माझे प्रेरणास्थान आहेत. 

डॉ.नरेंद्र दाभोलकर याच्या जीवनावर आधारित ही मराठी कविता लिहीली गेली आहे. मी माझ्या परिने एक छोटासा प्रयत्न केला आहे. 


डॉ.नरेंद्र दाभोलकर | मराठी कविता वाचन | डॉ.नरेंद्र दाभोलकर याच्यावर आधारित मराठी कविता | मराठी कविता
Dr. Narendra Dabholkar marathi kavita

 डॉ.नरेंद्र दाभोलकर


निघाले होते एकटेच तुम्ही
त्या काटेरी पंथावर हाती होती फक्त मशाल… 

निघाले होते एकटेच तुम्ही
घेऊनी हाती ज्ञानाची ढाल… 

मार्ग होता खडतर
पण, अंगात होते शहाणपण… 

मार्गात होते बोचणारे ते बाभळीचे काटे
पण, तुम्ही होता त्यावर लावणारा मलम… 

तुम्ही ही ठाणले होते, 
नेईल त्यांना एकदिवस सत्याच्या पंथावर… 

दाखवेल त्यांना प्रकाशाचा खरा मार्ग. 
या अंधारलेल्या काळ्या-रातीला घातली होती शपथ… 

एक एक पाऊल तुमचे चालू होते पंथाकडे, 
माहीत होते खुप काही भिडून,चिरून जाईल या काळजाला… 

पण तुम्ही होता तयार
प्रत्येक सामण्यांला, प्रत्येक आयुष्यांतल्या डावांना…
 


तुम्ही जरी विजलातं तरी विजणार नाहीत
तुमच्या तोंडून निघालेले ते शब्द… 

जे देतील आणि कायम राहतील, 
या सैरवैर धावणाऱ्या वाऱ्यांत… 

तुम्ही आहे पेरलं खूप काही
आणि ते उगवेल हे माहित होते तुमच्या मनी… 

तुमचा एक दिवा विझला ! 
तरी, तयार आहेत लाखो दिवे जे घेऊन जातील तुमच्या मशालींला पुढे… 

फक्त माझं एवढंच आहे सांगण, 
तुम्ही ज्यांच्यासाठी लढला आयुष्यभर… 

ती विचारधाराचं घेऊन जाईल सर्वांना प्रगती पंथावर… 
तीच विचारधारा घेऊन जाईल सर्वांना यशाच्या शिखरांवर… 
      
                                                    – कोमल जगताप
       
Dr. NAREDRA DABHOLKAR 


Nighale hote ekatech tumhi
Tya kateri pathavar hati hoti fakt mashal … 

Nighale hote ekatech tumhi
Ghevuni hati dyanachi dhal… 

Marg hota khadtar
Pan, angat hote shahanpan … 

Margat hote bochanare te babhaliche kate
Pan, tumhi hoto tyavar lavnara malam … 

Tumhi hi thanale hote, 
Neyil tyanna ekdivas satyachya pathavar… 

Dakhavel tyanna prakashacha khara marg . 
Ya andharlelya kalya-ratila ghatali hoti shapath … 

Ek ek paul tumache chalu hote panthakade, 
Mahit hote khup kahi bhidun, Chirun jayil ya kaljala… 

Pan tumhi hota tayar
Pratyek samnyanla, Pratyek aayushyatalya davanna… 

tumhi jari vijala tari vijanar nahit
Tumachya tondun nighalele te shabda… 

Je detil aani kayam rahatil , 
Ya sairvair dhavanarya varyat … 

Tumhi aahe peral khup kahi
Aani te ugavel he mahit hote tumachya mani … 

Tumacha ek diva vijhala ! 
Tari, tayar aahet lakho dive je ghevun jatil tumachya mashalinla  pudhe… 

Fakt majh evadach aahe sangan ! 
Tumhi jyachyasathi ladhala aayushyabhar … 

Ti vichardharach ghevun jayil sarvanna pragati pathavar…. 
Tich vichardhara ghevun jayil sarvanna yashachya shikhravar…. 

                  -KOMAL JAGTAP


Note :  डॉ.नरेंद्र दाभोलकर या कवितेमध्ये मी माझ्या ज्या काही भावना डॉक्टर दाभोलकर याच्याविषयी आहेत त्यांना मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुणाच्याही भावनाना ठेस पोहोचणार नाही अशी आशा व्यक्त करते. 

 Also Read This Poems: 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *