marathi kavita charoli | prem charolya marathi | charoli

marathi kavita charoli | prem charolya marathi | charoli

Romantic Charolya in Marathi | Marathi Love Charolya | marathi charolya | charolya
Marathi Love Charolyaनमस्कार मित्रांनो, 

आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे Marathi Love Charolya या सर्व चारोळ्या डॉ.अनिल प्रभाकर दीक्षित यांच्या खिडक्या आणि चौकटी या पुस्तकामधून घेण्यात आल्या आहेत. 

या सर्व Romantic Charolya आहेत. भावनांना अगदी चपखलपणे या चारोळ्यामधून रेखाटण्यात आले आहे. खिडक्या आणि चौकटी या पुस्तकातील कविता तरुणाईला भुलविणाऱ्या आहेत. 

डॉ.अनिल प्रभाकर दीक्षित याच्या Marathi Love Charolya खास मराठी प्रेमिकांसाठी… 

Marathi Love Charolya” जेव्हा पाहावं तेव्हा
  तुझी खिडकी बंद
  खिडकीकडे पाहण्याचा
  माझा जुना छंद. “


” खिडकी समोरच्या तारेवरची
  कबुतरांची जोडी
  तुमचं पाहून काढायची 
  एकमेकांची खोडी.” 


” खिडकीचं त्या एकदां
  दार उघडं राहीलं
  झुळूक सहज आली
  तिनं पडद्याआडून पाहिलं. ” 


” तू त्याला बिलगलेली
  हातामध्ये हात
  गवाक्षातल्या गुलाबाचा 
  गंध आला आत. ” 


” ढळलेला पदर 
  तू जेव्हा सावरला
  चंद्रालाही पाहण्याचा 
  मोह नाही आवरला. ” 


” खिडकी बंद करून
  परक्याला दिलीस मुभा
  बंद खिडकीखाली
  मी एकटाच उभा. “


” उघडी खिडकी बघून
  माझी खात्री झाली
  चुरगळलेला गजरा जेव्हा
  टाकलास खाली. “


” खिडकीत एकटी बसून
  विचार जेव्हा करशील
  भाबड्या या कवितांचे
  आर्त शब्द स्मरशील. “


” एकमेकांच्या डोळयांत
  स्वप्न जेव्हा पाहिलं
  तुझं माझं असं मग 
  वेगळं काय राहिलं ? ” 


” तू समोर असतेस 
  तेव्हा काही सुचत नाही
  आणि नसतेस
  तेव्हा काही रूचत नाही. ” 


” प्राथनेला बळ आहे
  तपश्चर्येला फळ आहे
  प्रेम माझा श्वास आहे
  पुनर्जन्मावर विश्वास आहे. “


” प्रेम म्हणजे काय ? 
  रात्री रात्री जागणं
  आणि दिवसा 
  वेड्यासारखं वागणं. ” 


” चार चौघांत प्रेम करीन
  कोणाला काही कळणार नाही
  दु:खाच्याही वेळी गाली
  अश्रू ओघळणार नाही. “


” मना करूनही मनातली
  प्रतिमा कधी ढळणार नाही
  सांगून पहा पुन्हा पुन्हा
  कळलं तरी वळणार नाही. ” 


” तुझे येथे येणे जाणे
  अन् भोवतीचा वावर
  हालचाली टिपतांना
  मन होई अनावर. “


” हाती येतां येतां माझं
  माझं यश का हुकतं  ? 
  तुझ्या एका तुळशीपत्रानं 
  हे पारडं का झुकतं  ? “

***अजून मराठी प्रेम कविता नक्की वाचा ***

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *