Marathi Kavita Pradushan | Kavita on Pollution Marathi

Marathi Kavita Pradushan | Kavita on Pollution Marathi

 
 
 
प्रदूषण मराठी कविता | marathi kavita pradushan
marathi kavita pradushan

 

कवितेबद्दल –

 
मराठी कविता विळखा प्रदूषणाचा ही कविता ही प्रदूषणावर आधारित आहे. प्रदूषणामुळे नवनवीन समस्या निर्माण होत आहेत आणि त्यामुळे लोकांसमोर जीवघेणे प्रश्न उभे राहत आहेत. 
 
या कवितेच्या माध्यमातून प्रदूषणाचे परिणाम सांगण्याचा तसेच प्रदूषण मुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. प्रदूषणामुळे लहान मुलांवर होणारे दिर्घ परिणाम तसेच वेगवेगळे श्वसनाचे आजार लोकांना मृत्युच्या खाईत ओढत आहेत. 
 
हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. या आशयाने या कवितेचे लेखन केले गेले आहे. 
 
 
 
 
 
 

मराठी कविता – विळखा प्रदूषणाचा

 
विळखा हा प्रदूषणाचा
चहुबाजूंनी घेरून आहे
विळखा हा प्रदूषणाचा
निष्पाप जीव घेऊन जात आहे
विळखा हा प्रदूषणाचा
नाही बघत गरीब, श्रीमंत
विळखा हा प्रदूषणाचा
नाही घेऊ देत मोकळा श्वास
विळखा हा प्रदूषणाचा
जीवावर उठला यमांसारखा
विळखा हा प्रदूषणाचा
घेऊन जातो आहे अस्ताकडे
 
 
प्रदूषण मराठी कविता | marathi kavita pradushan
marathi kavita pradushan

 

 
विळखा हा प्रदूषणाचा
सुरू होतो घरापासून, स्वतःपासून
विळखा हा प्रदूषणाचा
भस्मासुर होऊन हाहाकार माजवतो आहे 
आणि कचऱ्याचे ढीग सारा आसमंत व्यापत आहेत
बनवला आहे आम्ही पण निचरा कुठे करायचा
विज्ञानाला विचारतो प्रश्न
भविष्य अंधारात ढकलायचा 
येणाऱ्या या पिढीने दोष 
कुणाला द्यायचा
स्वतःचे नशीब समजून
प्रदूषित श्वास घ्यायचा
विचारतो आम्ही प्रश्न जगाला
पण उत्तर आहे स्वता:पाशी
तुच कचरा करतो तयार
आणि प्रश्न घेऊन जातो जगापाशी 
प्रदूषणाचा विळखा घट्ट होत आहे
आणि तु मात्र त्याला भडावा देत आहे
आठव ते गाडगे महाराज 
काय शिकवण देऊन गेले आहेत
थांबव आता तु हे सारं
सारं जग तुझ्याकडे आशेने बघत आहे
सारं जग तुझ्याकडे आशेने बघत आहे….
 
– कोमल जगताप
 
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top