Romantic Charoli in Marathi | Charoli Kavita Prem | Charoli

Romantic Charoli in Marathi | Charoli Kavita Prem | Charoli

चारोळ्या प्रेमाच्या | प्रेम चारोळ्या मराठी | प्रेमचारोळी | best marathi prem charolya | prem charolya | premachi charoli
प्रेम चारोळ्या मराठी

नमस्कार मित्रांनो, 

आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे चारोळ्या प्रेमाच्या या सर्व प्रेम मराठी चारोळ्या डॉ.अनिल प्रभाकर दीक्षित यांच्या खिडक्या आणि चौकटी या पुस्तकामधून घेण्यात आल्या आहेत. 

या सर्व प्रेमावर चारोळ्या आहेत. भावनांना अगदी चपखलपणे या चारोळ्यामधून रेखाटण्यात आले आहे. खिडक्या आणि चौकटी या पुस्तकातील कविता तसेच चारोळ्या खरोखरचं तरुणाईला भुलविणाऱ्या आहेत. 

डॉ.अनिल प्रभाकर दीक्षित याच्या चारोळी प्रेम कविता खास मराठी प्रेमिकांसाठी तसेच माझ्या प्रिय वाचकांसाठी…घ्या आनंद या सर्व प्रेम चारोळ्याचा… 

चारोळ्या प्रेमाच्या” कवितेला तशी तिनं
  दाद नाही दिली
  पण गालावरची लाली 
  बरचं सांगून गेली. “


” कविता बहुतेक तिला
  नसावी रूचली 
  पण ओठावरचं स्मित पाहून
  आणखी कविता सुचली. “


” आजवर ज्या कविता
  गुणगुणलो तिच्या कानात
  त्या काल मी पाहिल्या
  रद्दीच्या दुकानात. “


” स्फूर्ती कसली प्रतिभेचा हा
  चार दिवसांचा दंगा 
  काल प्रकटली गुप्त जाहली
  राजापूरची गंगा. “


” अबोला इतका बोलका
  की शब्दांना काही काम नाही
  रूसणं इतकं गोड
  की हसण्यात काही राम नाही. “


” अबोल्याचा सुद्धा
  हा एक फायदा आहे
  वाद नाही घालायचा
  हा इथला कायदा आहे. “


” सारं काही समजून
  भोळेपणाचा आव 
  तुझ्या गूढ मनाचा
  न लगे कधी ठाव. “


” ‘ओ’ नाही द्यायची
  जरी कुणी घातली साद
  तुझ्या निग्रहाला माझी 
  मनापासून दाद. “


” सहज समोर येशील
  आपणहून बोलशील 
  कल्पनेला वाव आहे
  स्वप्नांचा हा गांव आहे. “
 

” मला वाटत होतं

  मीच एक ज्ञानी
  तू म्हणालीस
‘ यू आर वन ऑफ द मेनी ! ‘  “


” बाग सुकोनिया गेली
  कोमेजली सदाफुली 
  परडीत थोडी फुले
  अबोलीची उरलेली. “


” लहान मुलांशी खेळताना
  खोटं खोटं हरावं
  आपण मोठे आहोत
  हे सततच स्मरावं. “


” भिंतीलाही असतात कान 
  दरवाजाला डोळे
  विचार करावा करण्यापूर्वी
  भलते सलते चाळे. “


” समुद्रावरची लाट दुरून येते
  काठावरच्या वाळूत विरून जाते
  तसा तुझा राग 
  त्याचा राहत नाही माग.”


” एकांताचं एखादं 
  रम्य स्थळ असावं
  दोघचं दोघं आपण
  तिथे तिसरं कोणी नसावं. “


” गुजगोष्टी करीत
  तुला कवेत घेऊन बसावं
  दिवसासुद्धा डोळयांना
  सुख स्वप्न दिसावं. “


” नेहमी तुझं बरोबर
  माझंच का चुकतं ? 
  तुझं फुल टवटवीत
  माझंच का सुकतं  ? “

***अजून मराठी प्रेम विरह चारोळ्या वाचा***

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *