Sasu ani Sunevar Marathi Kavita

Sasu ani Sunevar Marathi Kavita

 
 
 
 

मायेचा ओलावा मराठी कविता

 
काळ कालचा मागे पडला,
आजची सासू माय झाली…
कटुतेचा झबला झुगारून,
आजची सुन ही सखी झाली…
कारण,
सासू-सुनेची मैत्री झाली…
काळ कालचा लावून गेला,
सासू-सुनेच्या चुघल्या हो !
येणाऱ्या भविष्याला सामोरे जाताना,
धरला एकमेकींनी एकमेकींचा हात हो  !
कारण,
सासू-सुनेची मैत्री झाली…
एकमेकींनी एकमेकींना
दिला शब्दाचा आधार हो  !
मायेने जवळ आले
एकमेकींचे हात हो  !
कारण,
सासू-सुनेची मैत्री झाली…
एकमेकींना समजूनी घेतले
विश्वासाचे मळे बहरले,
ओसांडूनी मग आता फक्त आणि फक्त
मायेच्या ओलाव्याचे क्षणचं विरघळले…
कारण, आता घट्ट अशी
सासू-सुनेची मैत्री झाली…
     – कोमल जगताप

कवितेबद्दल –

मराठी कविता मायेचा ओलावा ही कविता सासू-सुनेच्या नात्यावर आधारित आहे. मायेचा ओलावा या कवितेच्या
माध्यमातून सासू-सुनेचे घट्ट नाते अधोरेखित केले आहे.
प्रत्येक घरामध्ये सासू-सुनेचे नाते आपण लहानपणापासून बघत असतो. फार पूर्वीपासून आपल्या मनामध्ये या नात्याबद्दल फार संभ्रम आहे. पुर्वी आपण खुप सारे मराठी चित्रपट पहायचो. या चित्रपटामध्ये सर्रासपणे सासू-सुनेचा किती छळ करते हे दाखविले जायचे आणि आपण याच नजरेने या नात्याकडे पाहायचो. ( चित्रपटामध्ये दाखवायचे कारण तेच लोकांना आवडायचे.)
परंतु माझ्या मते कोणतेही नाते असो, त्या नात्यामध्ये विश्वास असेल, संवाद असेल, समजून घेण्याची वृत्ती असेल तर अशा नात्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होऊ शकत नाही. उलट त्या घरामध्ये सुख, शांती ,आनंद, प्रेम, माया हेच आयुष्यभर ओसांडून वाहेल.
आता खरोखरच समाजामध्ये बदल घडत आहे. सासू-सुनेचे नाते दिवसेंदिवस सुंदर रितीने फुलत आहे. आनंद दुसरा कोठेही नाही तो आपली माणसे जवळ असण्यात असतो.
ही कविता आपणास कशी वाटली हे मला नक्की कळवा.
धन्यवाद… आपण या वेबसाईटला भेट दिली 🙏🙏🙏

अजून मराठी कविता वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top