virah charolya | virah charolya marathi | charoli kavita

virah charolya | virah charolya marathi | charoli kavita

virah charolya | virah charolya marathi | विरह चारोळी
virah Charolyaनमस्कार मित्रांनो, 

आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे Marathi Virah Charolya या सर्व चारोळी डॉ.अनिल प्रभाकर दीक्षित यांच्या खिडक्या आणि चौकटी या पुस्तकामधून घेण्यात आल्या आहेत. 

या सर्व विरह चारोळ्या आहेत. भावनांना अगदी चपखलपणे या चारोळ्यामधून रेखाटण्यात आले आहे. खिडक्या आणि चौकटी या पुस्तकातील कविता तरुणाईला भुलविणाऱ्या आहेत. 

डॉ.अनिल प्रभाकर दीक्षित याच्या Marathi Love Virah Charolya खास मराठी प्रेमिकांसाठी तसेच माझ्या प्रिय वाचकांसाठी … 

 विरह चारोळी मराठी” सुखापेक्षा दु:ख दे
  फुलांपेक्षा काटे
  कविता जेव्हा जन्मते
  जेव्हा हुरहुर वाटे. ” 


” खरं म्हणजे खोटं
  आणि खोटं म्हणजे खरं
  मनाला समजावण्यासाठी
  माहीत असणं बरं. ” 


” अशी ही तगमग
  किती काळ साहू  ? 
  तुझ्या उत्तराची
  किती वाट पाहू  ? “


” तू सांगण्याआधीच 
  तुझा निर्णय कळला
  आणि माझा
  उरला धीर गळला. “


” तुझा कोण तो तू
  आधीच ठरवलेला
  त्या प्रेमवीरांच्या गर्दीत
  मी हरवलेला. ” 


” त्यांच्या रांगेत उभा राहून
  महामूर्ख ठरलो
  स्पर्धा सुरू होण्याआधी
  सपशेल हरलो. ” 


” दूर लोटलंस मला
  माझा झाला अंत
  परक्याला जवळ केलंस
  याची मला खंत. ” 


” हाती लागता लागता
  सुख दूर पळालं
  मला असं दुखवून
  तुला काय मिळालं  ? ” 


” नुरली आशा सरलं झुरणं
  प्रेमामधलं झपाटणं
  तेलही गेलं तूपही गेलं
  हाती उरलं धुपाटणं. ” 


 ” साऱ्यांनी सांगितलं
   मृगजळामागे धांवणं व्यर्थ आहे
   पण मला वाटलं
   त्यातचं खरा अर्थ आहे. “


  ” भांडण नाही तंटा नाही
    इंटरेस्टींग गेम आहे
    मनापासून खेळणाऱ्यांचं 
    परस्परांवर प्रेम आहे. “


   ” कविता नाहीत या
     भावनेच्या भरातलं कृत्य आहे
     माझं तुझ्यावर प्रेम आहे
     हे त्यांतलं सत्य आहे. “


  ”  भाराभर कविता
     शब्दांचं भारुड
     त्याला कारण तुझं
     मनावरचं गारूड. “


  ” दु:ख सुद्धा इतकं गोड 
    की चवीचवीनं चाटावं 
    दु:ख सुद्धा इतकं गोड 
    की अमृतचं वाटावं. “


 ”  दु:ख मधासारखं गोड 
    मनाच्या पोळ्यात साठावं
    दु:खाच्याच सोबतीनं
    आयुष्य सारं काटावं.”


”  दु:खाच्याच सावलीत
   एक घर थाटावं
   दु:ख इतकं उदंड
   की कंठाशी दाटावं. 


”  असं दु:ख देणारं
   कोणीतरी भेटावं
   त्या गोड आठवणीत 
   आयुष्य पुढे रेटावं.”
***अजून मराठी प्रेम चारोळ्या वाचा ***


0 thoughts on “virah charolya | virah charolya marathi | charoli kavita”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *