कोरोना कविता मराठी | Corona Poem Marathi | Covid-19 Poem in Marathi

कोरोना कविता मराठी  | Corona Poem Marathi | Covid-19 Poem in MarathiPoems against coronavirus (COVID 19) in Marathi
Corona Poem Marathi

कवितेबद्दल-मराठी कविता कोरोनावायरस ही कविता कोरोनाच्या पाश्वभूमीवर लिहिली गेली आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आपल्या सर्वांना यामधून बाहेर पडण्यासाठी सर्व प्रथम मानसिक रित्या सक्षम व्हावे लागेल आणि आत्मविश्वासाने यामधून मार्ग काढावा लागेल. 

आपला वेळ व्यर्थ न घालवता कारणी लावला पाहिजे. 

या कवितेच्या माध्यमातून काही गोष्टी सुचविण्यात आल्या आहेत त्या सर्वांनी अमलात आणल्या तर नक्कीच आपण या संकटातून लवकरच बाहेर पडू आणि आनंदाने जगू. 

आपण सर्वजण नियमाचे पालन करून कोरोनाला नक्कीच हरवू.

कोरोना – मराठी कविताकोरोना, कोरोना, कोरोना या शब्दांचीच आहे जगभर चलती… 

साऱ्या भल्या-भल्या राष्ट्रांनी घेतली आहे कोरोनांची धास्ती… 

कोरोना, कोरोना, कोरोना हा शब्दचं आहे सर्वत्र… 

कोण आहे हा कोरोना करतोय मानव जातीचा अंत… 

गरीबाला रोटी मिळेना…. 

श्रीमंताला झोप येईना… 

लहान मुलांना काही कळेना… 

आई-बाबा आमचे बाहेर पाठवेना…

सुट्टी हवी, सुट्टी हवी म्हणून करत होतो अट्टाहास… 

पण आता सुटीचाच होतोय आम्हाला त्रास… 

मित्र नाही मैत्रीण नाही आहोत सारे दारे बंद करून… 

मोबाईल, टीव्ही, संगणक, गेम यांच्याशी थकलो हितगुज करून…

रोज रोज किती अभ्यास करणार… 

संगणकावर बसुन किती डोळे दुखविणार… 

कधी जाणार रे तु कोरोना असा नाही आता केविलवाणा प्रश्न विचारणार…Poems against coronavirus (COVID 19) in Marathi
Corona Poem Marathi मीच माझा वेळ आहे आता कारणी लावणार… 

सकाळी सकाळी उठेल लवकर मी व्यायाम, योगा, मेडिटेशनची करेन संगत मी…. 

माझ्या आरोग्याची आता मीच काळजी करणार…. 

रोज रोज नाश्त्याला सारं पौष्टीक खाणार… 

चपातीला पाहून आता नाक नाही मुरडणार… 

तुला हरवण्यासाठी आता मीच मैदानात उतरणार… 

हसत खेळत गाणी म्हणत गप्पा मी मारणार… 

वाचत वाचत आता मी मोठा मोठा होणार… 

सारं सारं आता मी आनंदाने करणार… 

कोलमडलेले आयुष्य माझे मीच सुरळीत करणार… 

नक्की करू आम्ही कोरोना तुझ्यावर लवकरच मात… 

आमच्या आयुष्यची घडी विसकडण्याचा तुला कुणी दिला अधिकार…

पण आता मी माझा टाईम व्यर्थ नाही घालवणार…. 

आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकु, ताई-दादा सर्वांना मदतीला घेऊन इतरांना सहकार्य करणार…. 

कोरोनांशी लढण्यासाठी आता मीच मैदानात उतरणार…

सारे नियम पाळून माझ्या बांधवांना मीच आता आधार देणार … 

माझ्या मदतीचा छोटासा हात मी दूरपर्यंत पोहोचवणार… 

मीच माझा रक्षक बनून कोरोना तुला हरवणार…                                  – कोमल जगतापअजून मराठी कविता वाचा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *