Best Marathi Kavita on Words | Shabda Kavita
कवितेबद्दल :
शब्द ही कविता स्वलिखीत आहे. शब्द ही कविता जीवनावर आधारित आहे. शब्द ही कविता लेखनीवर आधारित आहे.
जीवनामध्ये खुप सारे अबोल प्रसंग येतात जेव्हा आपण लेखनीचा आधार घेतो आणि आपल्या भावना कागदावर उतरवतो.
अशाच काही भावना कागदावर उतरवण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केला आहे.
मराठी कविता – शब्द
किती मांडावे स्व:ताला
किती द्याव्या शब्दांना वाटा
शब्द संपले,विरुन गेले
ना कळले स्व:ताला
आले प्रश्न निघुनी गेले
पाहुनी उत्तराची वाट
वाटेतुन चालताना दिली
शब्दांनी साथ
आयुष्य सरेल उरतील कोडे
कोड्यांत दडले आयुष्य
तपासुनी बघीतला भुत आणि भविष्य
रांगेत उभा वर्तमान
काळाच्या या ओघाने
भुत पडला उघडा
भविष्याने कोडे रचिले
वर्तमान बोलला
– कोमल जगताप
shabda marathi kavita |
SHABDA – marathi kavita
Kiti mandave swatahala
Kiti dyavya shabdanna vata
Shabda sampale, virun gele
Na kalale swatahala
Aale prashna nighuni gele
Pahuni uttarachi vat
Vatetun chalatana dili
Shabdani sath
Aayusha sarel urtil kode
Kodyant dhadale Aayusha
Tapasuni baghitala bhut ani bhavishya
Ranget ubha vartman
Kalachya ya oghane
Bhut padala ughada
Bhavishyane kode rachile
Vartaman bolala
– KOMAL JAGTAP
छान च
छान 👌👌
Nice