Poem on Women in Marathi | Marathi Kavita
कवितेबद्दल –
मराठी कविता स्त्री ही कविता स्त्रियांवर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून स्त्रियांच्या इच्छा, आकांक्षा प्रस्तुत केल्या गेल्या आहेत.
मराठी कविता स्त्री
स्त्रीचं असणं,
नसणं
दोन्ही सारखचं
असतं
स्त्रीचं असणं,
पणं स्त्री नसणं,
दोन्ही सारखचं
नसतं
स्त्रीचं
स्त्री म्हणून
वागवून घेणं
सोपं असतं
पणं त्या स्त्रीला
स्त्री म्हणूनी
वागायला लावणं
मात्र कठीण असतं
स्त्रींच्या
गर्भात नऊ महिने
राहणं सोपं
असतं
पणं तेच
स्त्रींच्या डोळयांनी
बघितलेल्या नव्या
जन्माचं मोठं पर्व असतं
जरी
स्त्रींला
भातुकलीचां खेळ
आवडला
तरी
आकाशात उडणारं विमान
मात्र तिला हवं
असतं
– कोमल जगताप