Mulgi Janma Kavita in Marathi | Marathi Kavita Mulgi
mulgi kavita in marathi |
कवितेबद्दल –
मराठी कविता मुलगी ही कविता मुलीवर आधारित आहे. या कवितेमध्ये मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, निसर्गाने ही मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे.
mulgi poem in marathi |
मराठी कविता मुलगी – तिचा जन्म
तिचा जन्म झाला…
चिमुकल्या चिमुकल्या पायांनी घराची शोभा वाढली…
घरात लहानथोरांची वरदळ वाढली….
लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीचं घरात आली….
हसण्याच्या किलकाऱ्या घरात घुमू लागल्या…
काठीवर टेकलेली पंजी बालपणात हरवली…
दात नसलेल्या ओठांनी तिही बोबडी बोलायला लागली…
तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाचं ठरवू लागला…
रांगत रांगत सारा गावचं गोजिरा वाटला…
दारातील तुळशीही प्रसन्न झाली…
हसत मुखाने पुन्हा: टवकारल्यासारखे पाहू लागली…
दारातील लिंबाचे झाड मोठमोठ्याने हसू लागले…
जणू काही नभालाचं प्रतिउत्तर देऊ लागले…
गोठ्यातली गाय निवांत चारा खाऊ लागली…
जणू तिला तिच्या चाऱ्याचीचं चिंता मिटली…
तिच्या येण्याने घर नाही तर सारा निसर्गचं नटला…
अबाधित ठेवशील मला आणि या विश्वाला हा विश्वास मात्र त्याला पटला…
– कोमल जगताप
अप्रतिम कोमल फारच सुंदर रचना
कोमल ,नमस्कार आपली मुलगी या विषयावरील कविता सुंदर अप्रतिम आहे.खरोखरच लहान मुलीचं चालणं ,बोलणं,हसणं, रडणं सुध्दा एक वेगळाच अनुभव देऊन जातो.मुलीच्या येण्याने जणू साक्षात लक्ष्मीच घरी येते.मला हा अनुभव नुकताच नातीच्या रूपाने आला आहे. पुन्हा एकदा या सुंदर,अप्रतिम अर्थपुर्ण कवितेसाठी खूप खूप धन्यवाद.🙏
खूप खूप धन्यवाद