Aas Marathi Kavita | Marathi Poems
आस ही एक मराठी कविता आहे. मराठी कविता-आस ही कविता स्वलिखीत आहे. आस ही कविता आयुष्यावर आधारित आहे. आयुष्यामध्ये खुप सारे असे प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला कोणत्यातरी गोष्टीची आस लागलेली असते. आस या कवितेमध्ये मानवी भावना व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
आस मराठी कविता
सगळं आकाश माझ्या पायांपाशी
पण का? लागली आस मला माझ्या जीवनाची
सगळं जीवन माझ्या हाताशी
पण का? लागली आस मला माझ्या उद्याची
सुर्य माझ्यासाठी उगवणारा
पण का? मला भिती त्याच्या डुबण्याची
या प्रकाशमय वातावरणात
का? ओढ मला त्या काळोख्या रातीची
रातीचा हा काळोख
त्यात किरकिरणारा रातकिडा
कुठे हरवला माझा
सोनेरी क्षणाचा झरा
या ही क्षणांना दृष्ट न लागो
या काळ्या भयान रातीची
– कोमल जगताप
Aas Marathi Kavita
Sagal aakash majhya payapashi
Pan ka? Lagali aas mala majhya jivanachi
Sagal jivan majhya hatashi
Pan ka? Lagali aas mala majhya udyachi
Surya majhyasathi ugavanara
Pan ka? Mala bhiti tyachya dubanyachi
Ya prakashmay vatavarnat
Ka? Odh mala tya kalokhya ratichi
Ratichi ha kalokh
Tyat kirkirnara ratkida
Kuthe harawala majha
Soneri kshanacha jhara
Ya hi kshananna drushta na lago
Ya kalya bhayan ratichi
– KOMAL JAGTAP