Love Birds Marathi Poem | Love Poem in Marathi | Kavita

Love Birds Marathi Poem |  | Love Poem in Marathi | Kavita
प्रेम पक्षी मराठी कविता | Prem kavita | marathi prem kavita
प्रेम कविता

कवितेबद्दल –


मराठी कविता प्रेम पक्षी ही एक प्रेम कविता आहे. तसेच या कवितेच्या माध्यमातून एका प्रेमी युगलाचे वर्णन करण्यात आले आहे.

प्रेम पक्षी ही कविता प्रेमी युगलाचा आयुष्य प्रवास सांगते आहे.

प्रेम पक्षी मराठी कविता | Prem kavita | marathi prem kavita
प्रेम कविता
प्रेम पक्षी मराठी कविता


आकाशी दिसले उडालेले ते दोन पक्षी ! 
ध्येय त्याचे एक नि आकाश त्याचे एक… 
गाणे मधूर गात होते एकमेकांना साथ देत होते… 
आकाशी दिसले उडालेले ते दोन पक्षी ! 

एकमेकांच्या प्रेमात पार डुबून गेले ते दोन पक्षी… 
डोळयांनी डोळयांशी संवाद साधू लागले ते दोन पक्षी… 
दुनिया सारी विसरुनी गेले ते दोन पक्षी… 
आकाशी दिसले उडालेले ते दोन पक्षी ! 

आकाशाला साद घालीत कवेत त्याला घेत होते… 
साऱ्या जगाचे लक्ष त्यांनी त्याच्याकडे एकवटले होते… 
काय कुणास ठाऊक स्वप्न त्यांनी कोणते पाहीले होते… 
दूर आकाशी दोन पक्षी उडत होते… 

निश्चय त्यांचा ठाम होता पण पल्ला फार लांब होता… 
आकाशी दिसले उडालेले ते दोन पक्षी ! 

      – कोमल जगताप

अजून मराठी कविता वाचा –


मराठी कविता – नातं तुझं माझं ( आई आणि मुलीवर आधारीत मराठी कविता )Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *