कवितेबद्दल –
मराठी कविता गंध ही कविता प्रेमावर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून प्रेम भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
marathi gandha kavita |
गंध मराठी कविता
कुणाच्या येण्यानं मनं झालं हे घायाळं
न कळे या मनाला कुठे हरलं हे भान
नसूनी घरातं का ? शोधते आरशातं
आरशांच्या आडोशाला हसला गालातं
मन हे मोकाट सुटलयां जोरातं
नाही उरला त्यांसी कोणताही बांध
मनांच्या बाधांवरी फुलले सोन्यांचे कमळ
त्या कमळाला आलायं जाई-जुईचा गंध
गंध दरवळला आसमंती
दाही दिशांनी केलीयां गर्ती
– कोमल जगताप