Ranpakharu Marathi Kavita
कवितेबद्दल :
रानपाखरू ही एक मराठी कविता आहे. रानपाखरू ही कविता स्वलिखीत आहे.
प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी असा प्रसंग येतो की, आपल्याला आपले घरटे सोडून जावे लागते.
ही कविता एका नवविवाहित स्त्रीवर आधारित आहे माहेरहून सासरला जाणाऱ्या स्त्रीची द्विधा मनस्थिती या कवितेमध्ये रेखाटण्यात आली आहे.
marathi poem on missing home
रानपाखरू मराठी कविता
हर्ष झाला माझ्या मना
जाणार मी माझ्या घरा
येरे रानपाखरां
माझ्या स्वागताला
वाट बघतीयां वाट
सुन्न झालयां ते मन
परत ये लवकर
उराशी घेऊनी आभाळ
पाय ठेवती डांबुन
डोळे अश्रुंनी वाहुन
रिमझिमतो तो पाऊस
आला सरींना घेऊन
सरी माझ्या सख्या
झाल्या गोळा तयारीत
शब्द दाटले आतले आत
मध्येच फुतकरें ते नाक
नजर चुकवतियां नजर
चुकवूनी कुणाचा डोळा
न भिडे माझीयां नजरा
– कोमल जगताप
RANPAKHARU – marathi poem on missing home
Harsh jhala majhya mana
Janar mi majhya ghara
Yere ranpakhara
Majhya swagtala
Vat baghtiya vat
Sunn jhalaya te man
Parat ye lavkar
Urashi ghevuni aabhal
Pay thevati dambun
Dole ashrunni vahun
Rimzeemato to pavus
Aala sarinna ghevun
Sari majhya sakhya
Jhalya gola tayarit
Shabda datale aatale aat
Madhyech futkare te nak
Najar chukvatiya najar
Chukavuni kunacha dola
Na bhide majhiya najara
– KOMAL JAGTAP
छान �� ��
छान 👌 👌