New Marathi Prem Kavita Morani
marathi prem kavita morani |
कवितेबद्दल:-
मराठी प्रेम कविता मोरनी ही कविता तरूण मनाला साद घालणारी तसेच विचलित झालेल्या मनाच्या भावना मांडणारी एक कविता आहे. मोरनी ही कविता प्रेमावर आधारित आहे.
marathi prem kavita morani |
प्रेमावर आधारित कविता – मोरनी
मोरनी मी या बनातली
नाचते एकटी माझ्या तालांत
या ढगाळलेल्या पाचूंच्या बनात
पिंसारा फुलला माझा काही क्षणांत
धुईधुई नाचते मी
झाला आसमंत जागा
माझ्या पिंसाऱ्याला लागलायं
पानगळतीचा वेढा
नाचते मी धुईधुई
पण लक्ष आहे चहुबाजूंनी
शोधत राहते नजर
मोरनी त्या मोराची
त्या मोरनीने लक्ष वेधले साऱ्यांचे
मात्र ती बुडालीयां धुईधुई नाचण्यांमध्ये
मेघराजा आलायं पाहुणा तिच्या बनात
मोरनी बुडालींया त्याच्या स्वागतात
– कोमल जगताप