|
कवितेबद्दल :
वारा ही एक marathi kavita आहे. ही कविता स्वलिखीत आहे. ही कविता मानवी मनांवर आधारित आहे.प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण काही ना काही घेऊन येत असतो. अशाच एका निवांत वेळी हा क्षण मला कसा भासला याचे वर्णन मी या कवितेमध्ये केले आहे.
वारा मराठी कविता
हा भिरभिरणारा वारा
बोलतो खुप काही क्षणा-क्षणाला
हा झुळझुळणारा वारा
सांगुन जातो गालातल्या-गाला
हा शांत आहे आज
भेदून उठतो मना-मनाला
हे शांत दिसते आहे नभ
चिरुन उठते या काळजाला
एक- एक क्षण सरतो आहे पुढे
एक- एक दिवस उगवतो पुर्वेकडे
एका-एका क्षणाला उठतो असा काहुर
एक- एक दिवस नेतो अस्ताकडे वाहुन
–कोमल जगताप
VARA MARATHI KAVITA
Ha bhirbhirnara wara
Bolato khup kahi kshana-kshanala
Ha jhuljhulnara wara
Sangun jato galatlya-gala
Ha shant aahe aaj
Bhedun uthato mana-manala
He shant disate aahe nabh
Chirun uthate ya kaljala
Ek-ek kshan sarto aahe Pudhe
Ek-ek divas ugavato purve kade
Ek-ek kshanala uthato asa kahur
Ek-ek divas neto astakade vahun
– KOMAL JAGTAP