आठवणी मराठी कविता | Marathi Kavita on School Memories

आठवणी मराठी कविता | Marathi Kavita on School Memories

आठवण मराठी कविता | marathi kavita on memories
      Marathi kavita on memoriesकवितेबद्दल


मराठी कविता आठवणी (marathi kavita on memories) ही कविता आठवणींनवर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. आठवण मराठी कविता | marathi kavita on memories
       Marathi kavita on memories

आठवणी मराठी कविता


आहेत अजूनी त्या ताज्या आठवणी
आहेत अजूनी मनात घरटे धरुनी

आहेत अजूनी फिरतात माझ्याभोवती
अन् मी हरवलींये त्याच्याभोवती

आहे तो कानांत गोंधळ
आहे तो कानांत किलबिलाट
जणू पक्षी निघाले परतुंनी घरटयातं

आहेत लक्षात त्या गप्पा
अन् रंगलेल्या त्या मैफिली

कधी खो-खो,
तर कधी कबड्डी

जागा झाला होता तो व्हरांडा
ऐकू लागला होता त्या गप्पा

कधी रुसवे तर कधी फुगवे
तर कधी उगाचचं ती थट्टा-मस्करी
 

या आठवणी जिवंत होऊनी
नाचु लागल्या माझ्याभोवती

त्या वाटा अजूनही बोलावतात
त्या वाटा अजूनही आठवतात

ती झाडे अजूनी हाका मारतात
नकळत आपलेसे करतात

वेचावी वाटतात ती बोरे,
अन् गाबूळलेल्या त्या चिंचा
अधांतरी जिभेवर तरंगतात

पावसांमध्ये पाय चिखलात रोवुनी
दप्तर पाठीवरती गच्च पकडूनी
स्वःताचा तोल सांभाळत
घरचा रस्ता जणू चरमसीमा

कधी-कधी उठतो कालवा
या आठवणींचा

                – कोमल जगताप

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *