Aadhavani Marathi Kavita | Marathi Kavita on Memories

Aadhavani Marathi Kavita | Marathi Kavita on  Memories

 
 
आठवण मराठी कविता | marathi kavita on memories
      Marathi kavita on memories

कवितेबद्दल

 
मराठी कविता आठवणी (marathi kavita on memories) ही कविता आठवणींनवर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. 
 
 
 
 
 
 
 
आठवण मराठी कविता | marathi kavita on memories
       Marathi kavita on memories


आठवणी मराठी कविता

 

आहेत अजूनी त्या ताज्या आठवणी
आहेत अजूनी मनात घरटे धरुनी
 
आहेत अजूनी फिरतात माझ्याभोवती
अन् मी हरवलींये त्याच्याभोवती
 
आहे तो कानांत गोंधळ
आहे तो कानांत किलबिलाट
जणू पक्षी निघाले परतुंनी घरटयातं
 
आहेत लक्षात त्या गप्पा
अन् रंगलेल्या त्या मैफिली
 
कधी खो-खो,
तर कधी कबड्डी
 
जागा झाला होता तो व्हरांडा
ऐकू लागला होता त्या गप्पा
 
कधी रुसवे तर कधी फुगवे
तर कधी उगाचचं ती थट्टा-मस्करी


या आठवणी जिवंत होऊनी
नाचु लागल्या माझ्याभोवती
 
त्या वाटा अजूनही बोलावतात
त्या वाटा अजूनही आठवतात
 
ती झाडे अजूनी हाका मारतात
नकळत आपलेसे करतात
 
वेचावी वाटतात ती बोरे,
अन् गाबूळलेल्या त्या चिंचा
अधांतरी जिभेवर तरंगतात
 
पावसांमध्ये पाय चिखलात रोवुनी
दप्तर पाठीवरती गच्च पकडूनी
स्वःताचा तोल सांभाळत
घरचा रस्ता जणू चरमसीमा
 
कधी-कधी उठतो कालवा
या आठवणींचा
 
                – कोमल जगताप
 
 
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top