कवितेबद्दल –
मराठी कविता बोधी (kavita on meditation in marathi) ही कविता ध्यानावर आधारित आहे.
दररोज ध्यान केल्याने जे काही फायदे होतात तसेच, जे आत्मिक समाधान मिळते ते या कवितेमधून मांडण्यात आले आहे.
बोधी
मनाचे कोडे सुटले
मनाचे रोग मिटले
जन्माचे पांग फिटले
ज्याने बोधीला जानले
ज्याने बोधीला अंगीकारले
त्याला जीवनांचे रस्ते भेटले
श्वासाला जाने जाणले
मनाचे पडदे आपोआप गळूनी पडले
रोग रोगीयांचा मिटला
व्याकुळ मनाचा आधार खचला
क्षीण झाले हे सुख
क्षीण झाले हे दुःख
सुख, दुःख समरस
पाहतो डोळा शांत
– कोमल जगताप