Marathi Kavita Ekant | Marathi Kavita Ekta | Pravaas Poem in Marathi
कवितेबद्दल :
प्रवास हा ऐकट्याचा ही एक मराठी कविता आहे. तसेच , ही कविता स्वलिखीत आहे. प्रवास हा ऐकट्याचा ही कविता प्रत्येक माणसाच्या जीवनावर आधारित आहे. जीवनामध्ये खुप सारे असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्व:ताला ऐकटे समजतो. पण, कधी-कधी ऐकटेपणा पण खुप गरजेचा असतो. स्व:ताचे स्व:ताला समजून घेण्यासाठी…
प्रवास हा ऐकट्याचा – मराठी कविता
नकळत हे क्षण
आवडतात एकांतातले…
नकळत हे दिवसही
आवडतात एकांतातले …
नकळत हे आयुष्य
आहे एकांतातले …
आहेत या वाटा
एकांतातल्या …
वाटेत चालताना
भेटतात वाटसरु काही क्षणांपुरते …
पण, वाट ही ऐकट्याचीच
गुंतलिये एकांतामध्ये …
वाटेतले हे वाटसरु
विरंगुळा काही क्षणांचा …
पण, प्रवास हा
ऐकट्याचा …
हरवलेल्या पत्त्यांच्या
बंगल्यासारखा …
उन्हं, पावसाचा खेळ
की, लंपडाव काही क्षणाचा …
कधी भेभान वाऱ्यांमध्ये
स्व:ताचे घरटे शोधण्यांचा …
तर कधी स्वःताला
शोधण्यांचा …
प्रवास हा ऐकट्याचा…
– कोमल जगताप
Pravaas Haa ekatyacha – Marathi Kavita
Nakalat he kshan
Aavadtat ekantatale…
Nakalat he divsahi
Aavadtat ekantatale…
Nakalat he aayusha
Aahe ekantatale…
Aahet yaa vataa
Ekantatalya…
Vatet chalatana
Betatat vaatasaru kahi kshanapurate…
Pan, vaat hi ekatyachich
Guntaliye ekantamadhe…
Vatetale he vatasaru
Virangula kahi kshanacha…
Pan, Pravas Haa
ekatyacha…
Haravalelya patyanchya
Banglyasarakha…
Unha, pavasaacha khel
Ki, lapandava kahi kshanacha…
Kadhi bhebhan varyamadhe
Swatache gharate shodhanycha…
Tar kadhi swatala
shodhanycha…
Pravas Haa
ekatyacha…
– Komal Jagtap