Aajoba Marathi Kavita | Poem on Aajoba in Marathi

Aajoba Marathi Kavita | Poem on Aajoba in Marathi

 
 
माझे आजोबा मराठी कविता | Marathi Kavita on Grandfather | marathi kavita | marathi poems

 

माझा आजां – मराठी कविता ( आजोबांवर आधारित मराठी कविता) 

 
 
माझा आजां लयं रुबाबदार होता… 
त्याच्या असण्याचा साऱ्या घरावर दरारा होता… 
त्याच्या बोलण्यातचं सारा गाव सामावला होता…
साऱ्या गावाच्या मदतीला धावणारा माझा एकमेव आजां होता… 
बोलण्यात त्याच्या अजबच तोरा होता… 
स्वत: आनंदी राहण्याचा त्याचा एकमेव ठेका होता… 
माझा आजां लयं रुबाबदार होता… 
पण काय कुणास ठाऊक त्याला मुलीच्या जन्माचा फार राग होता… 
वंशासाठी दिव्याच्या हट्टाला तो पेटला होता… 
अखेरच्या श्वासाला पण का कुणास ठाऊक त्याला मुलीचाचं आधार वाटला… 
त्याच्या जाण्याने अखेरचा हातातून हात सुटला… 
पणं, माझा आजां लयं रुबाबदार होता… 
त्याच्या असण्याचा साऱ्या घरावर दरारा होता…
 
 
– कोमल जगताप
 
 

कवितेबद्दल –

 
माझे आजोबा ही कविता आजोबा वर आधारित आहे. या कवितेमध्ये आपल्या आजोबांच्या व्यक्तीरेखा अधोरेखित केल्या गेल्या आहेत. या कवितेमध्ये आपल्या आजोबांच्या काही चांगल्या तसेच काही वाईट गुणांना अधोरेखित केले आहे. आजोबांच्या मनात स्त्री जन्माविषयी एक प्रकारे तिरस्कार होता तो कवयित्रीनीं रेखाटला आहे. आजोबाच्या व्यक्तिरेखेला पुर्ण न्याय दिला आहे. तसेच आजोबांना झालेल्या स्व: चुकांची जाणीवही अधोरेखित केली गेली आहे. 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top