Swapn Marathi Kavita Komal Jagtap

Swapn Marathi Kavita Komal Jagtap

स्वप्न मराठी कविता | Swapn Kavita Marathi | Marathi Kavita on Dreams | Marathi Kavita | Marathi Poems | Kavita in marathi

कवितेबद्दल –

मराठी कविता स्वप्न सारं सारं काही करावसं वाटतं ही एक रम्य कविता आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील दडलेलं एक लहान लेकरू तसेच त्याच्या कल्पना या कवितेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. 

स्वप्न मराठी कविता – सारं सारं काही करावसं वाटतं

 

सारं सारं काही करावसं वाटतं…

स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…

 

बागेतलं फुल होऊन झुलावसं वाटतं…

इवल्या इवल्या फुलासोबत गावसं वाटतं…

त्याचा रंग पाहूनी मलाही फुलावसं वाटतं…

सारं सारं काही करावसं वाटतं…

स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…

 

स्वप्नाच्या दुनियेतली मीच माझी स्वप्नपरी 

हरवूनी जाते मी प्रत्येक क्षणोक्षणी…

माझ्या या स्वप्नांचा मिच बांधील बंगला

आकाशातील चांदण्यावरती झुला माझा झुलला…

 

इवले इवले पंख बांधूनी जाईल मी दूर आकाशी

चांदण्या आणि चंदाशी खेळीन मी लपाछपी

सारं सारं काही करावसं वाटतं…

स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…

 

मोरपिसारा लावूनी बनात नाचावसं वाटतं…

पाऊस आला, पाऊस आला रिमझिम करीत तालात… 

त्याच्यासोबत रूणूझुणू रूणूझुणू  नाचावसं वाटतं…

दूर दूर आकाशी उडावसं वाटतं…

 

सारं सारं काही करावसं वाटतं…

स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…

            

                        -कोमल जगताप

 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top