मराठी कविता भेदभाव ही कविता भेदभावावर आधारित आहे.
या कवितेच्या माध्यमातून भेदभावावर भाष्य करण्यात आले आहे.
भेदभाव मराठी कविता
आज खुप दिवसांनी चिमणी चिवचिवताना दिसली…
विचारत होती प्रश्न देवाला, “काय रे देवा… ! काय आज तुला माझी गरज भासली…???”
देव म्हणाला, “तु तर माझी पृथ्वीतलावरील कोकीळा आहे
तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवसाला काय शोभा आहे !!!”
चिमणी बिचारी मोहात पडली लाजली, बावरली पुन्हाः प्रश्न देवाला विचारु लागली…
“सांग ना देवा तु एवढा भेदभाव का केला…???
मला ठेवली चिमणी आणि माणसांला का ऐवढा हुशार केलासं? “
बघ तो माणूस कुढे कुढे नाही पोहचला…
आणि मी मात्र माझा अजून आंगण पण नाही सोडला…
देव म्हणाला “माफ कर चिमणी मी तर हा कधी विचार पण नाही केला… “
तुझा प्रश्न आहे माझ्या जिव्हांरी लागला…
बघतो काय तोडगा निघतोय याच्यांतून कळवतो मी तुला…
तोपर्यतं तु विहार कर या समोरच्या सरोवरांत ( म्हणजे डबक्यात )
चिमणी मात्र खुश झाली कारण, तिने भेदभावाची पहिली लढाई जिंकली….
– कोमल जगताप