Short Poem on Father in Marathi | Baba Kavita
कवितेबद्दल:
मराठी कविता बाबा ही कविता वडिलांवर आधारित आहे. या कवितेमध्ये वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या गेल्या आहेत. या कवितेमध्ये बाबा या नावाचे जीवनामधील अस्तित्व किती मोलाचे असते हे रेखाटण्यात आले आहे.
मराठी कविता – बाबा
‘बाबा‘ असतो वडासारखा
मातीत घट्ट रूतुन कुंटुबाला सावली देणारा
स्वता: ऊन सोसणारा
पण लेकरांच्या पंखात बळ देणारा
कधी ‘माय’ होऊन झुला झुलविणारा
तर कधी स्व:ताच्या वहाणा
लेकराला देणारा
कुंटुबाचे छत्र होऊनी
मायेची सावली धरणारा
प्रत्येक संकटाला सामोरे जाणारा
मुलांच्या हाकेला धाऊन येणारा
कुंटुबाला आधार देणारा
आयुष्यभर पिलांसाठी तग धरून
विस्तवावर चालणारा
आयुष्यभर नात्याला सिंचन देणारा
कधी घराची कौले, तर कधी घराच्या भिंती बांधणारा
प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याचा त्याचा ‘बाबा‘ धडलेला असतो
मनाच्या कप्प्यांमध्ये ज्याने त्याने लपविलेला असतो
– कोमल जगताप
पण खरेचं काय ‘बाबा’ असेच असतात ?
तुमचे बाबा कसे आहेत हे आम्हांला नक्की कळवा दोन ओळी बाबांसाठी लिहून पाठवा. आम्हाला आवडेल तुमचे बाबा जाणून घ्यायला.