Marathi Kavita Mangesh Padgaonkar | Marathi Paus Kavita

Marathi Kavita Mangesh Padgaonkar | Marathi Paus Kavita

 
 
 
 
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता | mangesh padgaonkar marathi poem
mangesh padgaonkar marathi poem

कवितेबद्दल-

 
 
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता या ब्लॉग मध्ये देण्यात आल्या आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी, तसेच कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकांमधुन घेण्यात आल्या आहेत. तसेच या ब्लॉग मध्ये मंगेश पाडगावकर यांच्या पाऊस कविता दिल्या गेल्या आहेत. या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांच्या आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या कविता माणसाला जगायला शिकवतात. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या पाऊस कविता खास तुमच्यासाठी…
 
 
 
 

गाणं माणसांचं, माणसांसाठी

माणूस

पाऊस आला

असाही पाऊस

कवितेविषयी

 
 

गाणं माणसांचं, माणसांसाठी

 
मी गाणं गातोय
ऐकताय ना? 
मी गाणं गातोय.
 
अहो कानवाले,
अहा ध्यानवाले, 
अहो गल्लीच्या नाक्यावरचे पानवाले ! 
कोणी असो, 
पिशवी असो की गोणी असो, 
शेजार असो की बाजार असो;
माणसांचं गाणं गातोय,  
ऐकताय ना?
मी गाणं गातोय.
 
माझी माणसं आहेत सगळी, 
माझी माणसं आहेत :
उपाशी, रोडकी माणसं, 
तापल्या उन्हात बोडकी माणसं, 
रडकी माणसं, 
चिडकी माणसं, 
भ्याली माणसं,
प्याली माणसं,
नियतीने उकिरड्यावर टाकलेली माणसं, 
देवळांपुढे रांगा लावून वाकलेली माणसं,
मांडव घालून मेजवानी झोडणारी माणसं, 
मैदानावर गदी॔समोर डरकाळ्या फोडणारी माणसं;
काही माणसं प्यादी असतात, 
काही माणसं कंटाळवाणी यादी असतात;
टाचेखाली बांगड्यांसारखी फुटणारी माणसं, 
तरीही राखेतून उडणारी माणसं;
माझी माणसं आहेत सगळी, 
माझी माणसं आहेत, 
त्यांचंच गाणं गातोय, 
ऐकताय ना?
मी गाणं गातोय. 
 
बागेतल्या बाकड्यावर
एकटं एकटं कोण रडतंय? 
गळ्यापर्यंत पाणी आलंय, 
श्वास कोंडून कोण बुडतंय?
ट्यांहो ट्यांहो कोण आलं? 
जयराम जयराम कोण गेलं? 
सगळं सगळं बघतोय मी, 
सगळं सगळं जगतोय मी,
या बघण्याचं, या जगण्याचं
गाणं गातोय,
ऐकताय ना?
मी गाणं गातोय, 
 
वीज झेलून घेणाऱ्या छातीतून
शब्द येतात माणसासाठी, 
रुजू आल्या मातीतून
शब्द येतात माणसासाठी, 
निष्पाप हसत शब्द येतात माणसासाठी, 
अश्रू पुसत शब्द येतात माणसासाठी,
माणसावर विश्वास ठेवून
शब्द येतात माणसासाठी :
या शब्दांचं, विश्वासाचं गाणं गातोय,  
ऐकताय ना?
मी गाणं गातोय
 
– मंगेश पाडगावकर
 
 
 
 
 

माणूस

 
 
गोष्ट खरी की! गावोगाव
असतो फिरत नाचत मी;
जमलेले भोवती माझ्या
गदी॔चे गठुडे
हळू हलक्या हाताने मोकळे वारीत. 
 
समोर गदी॔ विसावलेली दिसली की, 
नाचता नाचता गाऊही लागतो मी! 
 
गुंडाळलेली असतात मी 
माझ्या कमरेभोवती
मोराची पिसे, 
हातातली मोरपिसे झुलवत असतो:
त्याखेरीज समोरव्या गदी॔ला
येत नाही झुलवता
हा माझा हमेशा अनुभव! 
 
गदी॔ विसावते, 
हळू हळू सुखावते, 
आणि मग समोरच चेहरे
गदी॔चे उरत नाहीत :
प्रत्येव. चेहरा माणसाचा दिसू लागतो, 
आणि याचा पत्ताही नसतो त्यांना! 
 
नाचता नाचता, 
नाचवता नाचवता, 
मला जेव्हा दिसू लागतात
समोरचे चेहरे माणसांचे, 
तेव्हा सांगतो आर्जबून मी त्यांना :
बाप हो मोराने खुषीने टाकली तरच
पिसे त्याची करा गोळा, 
नशीब समजून आपले! 
आणि मग हवी तितकी गुंडाळा
कमरेभोवती, डोक्याभोवती… 
 
माणसांचे उजळलेले चेहरे
रूमझुमलेले झुलताना दिसतात समोर, 
त्या वेळी नाचत असतो
माझ्या मनात नादावून 
गडद निळा एक मोर! 
 
नाचून नाचून
येतो जेव्हा घरी थकून, 
तेव्हाही मोर माझ्या मनातला
निळेभोर नाचणे आपले उधळत असतो… 
आणि मी हसून बोलतो स्वत:शी :
समोरच्या एका जरी माणसाने
धारदार लोभाची आपली कोयती
मोराच्या मानेवरून फिरवण्याचे थांबवले
आणि आपल्या मनातला
कोवळा झरा
नाचणाऱ्या मोराच्या पायापर्यंत पोचू दिला
तरी माझे नाचणेगाणे मला पावले! 
 
किती जरी गदी॔ असली
तरीही त्या गदी॔त
माणसाचा चेहरा शुल्लक असतोच
या माझ्या विश्वासाच्या खांद्यावर
मी माझी थकलेली मान ठेवतो! 
 
ओलावून मिटलेल्या माझ्या डोळयांत
एक मोर विश्वासाने नाचत असतो! 
 
 – मंगेश पाडगावकर
 
 
 
 
 
 
 
मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता | mangesh padgaonkar marathi poem
mangesh padgaonkar pause kavita


पाऊस आला

 
पाऊस आला,
पाऊस आला,
पाऊस आला घरांवर,
पाऊस आला स्वरांवर,
पाऊस आला नाचणाऱ्या मोरांचा,
पाऊस आला
 
पाऊस आला वाऱ्याव्या श्वासाचा,
मातीच्या वासाचा, 
हिरव्या हिरव्या ध्यासाचा;
करीत आला वेड्याचा बहाणा, 
पाऊस आला आतून आतून शहाणा.
 
पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा,
राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा, 
पाऊस आला गोकुळातल्या माळावर,
पाऊस आला यशोदेव्या भाळावर,
पाऊस आला उनाडणारा गोवळा,
पाऊस आला पालवीसारखा कोवळा.
 
येथै येथै पाऊस आला, 
तेथै तेथै पाऊस आला, 
ताथै ताथै पाऊस आला. 
 
फुलण्याचा उत्सव होऊन
पाऊस आला,
झुलण्याचा उत्सव होऊन
पाऊस आला.
 
पावसाने या जगण्याचा उत्सव केला, 
पावसाने या मरण्याचा उत्सव केला. 
 
जगणं आणि मरण, 
बुडणे आणि तरणं,
यांच्या पल्याड कुठे तरी पाऊस आला. 
 
पाऊस आला याद घेऊन,
ओली चिब साद घेऊन. 
 
बाहेर जरी ढगातून पाऊस आला, 
खरं म्हणजे आतून आतून पाऊस आला, 
पाऊस आला.
 
– मंगेश पाडगावकर
 
 
 
 
 
 
 

असाही पाऊस

 
गडगडत, बडबडत, उनाडत,
पाऊस येतो धपाधपा कोसळत, 
सामोरा, सैरावैरा, अस्ताव्यस्त, 
त्याला नाही मुळीच सोसत
कोणीही त्याखेरीज लक्ष कुठे दिलेले! 
 
पाऊस महासोंगाड्या रहतो उभा
देवळापुढल्या फूटपाथवर भाविकपणे, 
पुटपुटत करू लागतो नामजप श्रद्धेने, 
आणि मग अकस्मात खो-खो हसत
लगट करतो एखाद्या नाजूकरंगीत छत्रीशी!
 
झाडांना झोबत येतो, 
पारंब्याना लोबत येतो, 
डोगराची उशी घेतो, 
नदीला ढुशी देतो! 
 
शाळेपुढल्या गल्लीत पाऊस
नव्यानेच सायकल शिकतोय तसा वाटतो! 
 
वैतागलेला मिशीदार हवालदार
तसा पाऊस कधी कधी
घोगऱ्या सुरांत डाफरतो! 
 
मुंबईतल्या भैयासारखा पाऊस कधी
दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची
याद येऊन उदास होतो, 
आणि मग एकसुरी आवाजात
एकटा एकटा 
तुलसीचे रामायण गाऊ लागतो! 
 
पाऊस माझ्या खिडकीत येतो, 
काय सांगू? सपशेल नागडा! 
कमीत कमी लंगोटी? 
तिचासुद्धा पत्ता नसतो! 
हुडहुडी भरलल्यासारखी
माझी खिडकी थडाथडा वाजू लागते! 
सपकारत खिडकीतून मला म्हणतो :
” उठ यार, कपडे फेक, बाहेर पड, 
आजवर जगले ते कपडेच तुझे, 
एकदा तरी चुकून तू जगलास काय? 
बाहेर पड, कपडे फेकून बाहेर पड,
गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया! “
 
 – मंगेश पाडगावकर
 
 
 
 
 
 

कवितेविषयी

 
हातात हात घट्ट धरुन
माणूस बोलतो माणसाशी,
सहजपणे श्वास घेतो,
सहजपणे बसतो, हसतो,
कवितेला तसं सहज हसता येईल ? बसता येईल ? 
माणसासारखं माणसाशी बोलता येईल ?
 
छोट्याशा घरगुती समांरभात
मी म्हटल सहज त्या मुलीला :
” म्हण ना एक गाणं.”
पेटी नाही ,साथबीथ काही नाही,
न घेता आढेवेढे कसलेही
तिने एक बाळबोध गाणं म्हटलं
आपणच बोटानी ताल धरीत.
स्वच्छ आघोळ करुन आपण बाहेर यावं
तसं तिच्या गळ्यातून गाणं आलं : 
तस ते स्वच्छ स्वच्छ न्हालेपण
लेवून अगदी सहजपणे
कवितेला येता येईल ?
 
संमेलन मंडपात तो तरुण
माझ्या जवळ येऊन म्हणतो :
” सर, जरा बाहेर याल का थोडा वेळ ? “
 
आर्जव त्याचं जाणवून मी
त्याच्या मागून चालत गेलो.
गर्दीपासून जरा दूर गेल्यावर
तो थांबला ,घाबरल्यागत म्हणला :
” सर, एक सांगू का ?
मला ती आवडते !
तिच्यावर मी प्रेमाचं गाणं लिहिलयं,
तुम्हांला ते गुणगुणून दाखवायचंय. “
 
कोवळ्या सुरात त्याने गाणं म्हटलं : 
फुलाला फुलपाखराचा स्पर्श होतो अगदी तसं !
 
गाणं संपलं ,तेव्हा तो संकोचाने म्हणाला : 
” सर, मी प्रेमाचं गाणं लिहिलयं
हे मात्र कोणाला सांगू नका ! 
विद्रोहाचा कवी म्हणून मला ते मानतात,
तसंच मी लिहीलं पाहिजे,
नाही तर दलितांच्या बांधिलकीशी,
आंबेडकर , फुले यांच्या प्रेरणेशी
याने हा द्रोह केला असं म्हणतील
आणि मला वाळीत टाकतील !
प्रेमाचं हे हळवं गाणं
माझ्यासाठी , तिव्यासाठी,
आणि सर,तुमच्यासाठी असचं समजा ! “
 
क्रांती-बिती
बांधिलकी-बिंधिलकी,’
हटाव-उठाव,
हाणो-मारो,
लढा-बिढा,
मोर्चा-बिर्चा,
झिंदाबाद- मुर्दाबाद
टकरायेगा-बिकरायेगा… 
हे सगळं अटळ हे कळतं मला,. 
लढलं तर पाहिजेच हे कळतं मला;
तरीसुद्धा मी क्षुब्ध्र गदी॔च्या
बाहेर, फक्त काही क्षण, 
सावळं-सुरेल प्रेमाचं गाणं होऊन
कवितेला स्वत:शीच गुणगुणत
मोर्चाबाहेर येता येईल?
 
कोंदट खोलीत कोंडलेल्या
लायब्ररीच्या पुस्तकांचा
नाकात खाज आणणारा
अहंकारी तिरसट वास
येऊ लागलाय कवितांना, 
धुळीने पार घेरून टाकलाय त्यांना, 
कोणीच तिथे फिरकत नाही, 
त्वचारोग झालेल्या व्यामिश्र प्रतिमांचा एकातच
असतो तिथे स्वत:च्या मांड्या खाजवीत! 
 
स्वच्छ मोकळ्या वाऱ्यावर
खुची॔ टाकून बसावं संध्याकाळी, 
कवितेच्या सोबत तसं कधीतरी
थोडा वेळ बसता येईल? 
 
– मंगेश पाडगावकर
 
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top