Marathi Kavita on Food | Anna Marathi Kavita

Marathi Kavita on Food | Anna Marathi Kavita

 

कवितेबद्दल –

 
मराठी कविता अन्न (Marathi kavita on food) ही कविता अन्नावरती आधारित आहे.अन्न हे जीवन जगण्यासाठी किती गरजेचे आहे हे या कवितेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
 
 
अन्न मराठी कविता | Marathi kavita on food | Kavita on food | Poem on food in Marathi
Marathi kavita on food

 

अन्न मराठी कविता

 
पोटात अन्न असल्याशिवाय
ओढ जीवनाची लागत नाही
 
रिकाम्या पोटी अन्नाचा
वास घेऊन चालत नाही
 
पोटात अन्न असेल तर
जीवन कसं अगदी सुसह्य होतं
 
पोटात अन्न नसेल तर
वेदना मिळते जीवंतपणी मरणाची
 
ताटातल्या अन्नाचा आदर करा
कारण तेच अन्न तुम्हाला जगवतयं
आणि तुमच्या ताटातलं अन्न 
कुणाला तरी उपाशी ठेवतयं
 
अन्न हे पूर्णब्रह्म हे सत्य वचनी बघीतलं
काल दुपारी एका कामगाराला विटलेला भात धुऊन खाताना पाहिलं
कारण त्याला कुठेतरी अन्नाचा चटका बसला होता
तो जाणत होता हे अन्न टाकून दिलं तर मी उपाशी मरणार
त्यापेक्षा खाऊन मरतो म्हणून त्याने ते सर्व खाल्लं
 
किंंमत कळते अन्नाची त्या दीनदुबळ्या गरीबांला
एक भाकरी मिळवण्यासाठी वहावी लागतात ती शंभर किलोची गोणी त्याला विचारा त्या अन्नाची खाताना कशी येते गोडी
 
दोन पैसे मिळवण्यासाठी वणवण फिरून पिल्लांना घेऊन येते चारा तिला विचारा त्या अन्नाची किंमत काय असते
ति एकचं उत्तर देईल
” पोटाची खळगी भरण्यासाठी पिल्लांना वाऱ्यावर सोडून शोधत असते चारा
माहीत नाही परत येईल की नाही म्हणून जाताना उपदेश करून जाते खूप सारा “
 
या अन्नासाठी सारेच फिरतात वणवण
या अन्नामुळे जग फिरतयं गरगर
 
या अन्नाने खुप काही शिकवलं
जगण्यासाठी मायीनं साऱ्यापुढे हात पसरलं
 
इथेच थांबत नाही या अन्नाची कथा
सुरू होते त्याच्यापासून आणि संपते ही त्याच्यापाशी…. 
 
 
 – कोमल जगताप
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top