Marathi Kavita on Mind | Mann Marathi Kavita
Marathi kavita on mind |
कवितेबद्दल –
मराठी कविता थांबना रे मना (marathi kavita on mind) ही कविता मनावर आधारित आहे. मन हे किती चंचल आहे अगदी फुलपाखरांसारखे फुलपाखरू जसे एका फुलांवरुन दुसऱ्या फुलांवर काही क्षणात पलायन करत असते. तसेच, मन विचारांमध्ये अगदी बुडून गेलेले असते एका विचारातून दुसऱ्या विचारात. थांबना रे मना ही कविता मनावर आधारित आहे.
Marathi kavita on mind |
मनावर आधारित कविता – थांबना रे मना
थांबना रे मना
बैसना रे जरा
किती सैरवैर धावशील
कधी पेरुच्याबागा,
कधी सिताफळाच्या बागा
ऐकना रे जरा
बैसना रे जरा
पडेल विश्व छोटे
विचार फार मोठे
ऐकना रे जरा
बैसना रे जरा
मी तर आहे एकटी घरा
नाही कोणी बोलाया जरा
तु तरी थांबना रे जरा
ऐकना रे जरा
बैसना रे जरा
खायला उठे घर सारे
पणं नाही ऐकायला कोणी घरा
म्हणून सांगे मी बार-बार
ऐकना रे जरा
बैसना रे जरा
बोलू बरसं काही
भरवू गप्पांची मैफील
म्हणून बोले मी बार-बार
पणं नाही ऐकायला तु तयार
ऐकना रे जरा
बैसना रे जरा
थांबना रे मना
– कोमल जगताप
अप्रतिम 😊 कविता केली