Marathi Kavita Prakash On Life | New Poets Marathi Poems
marathi kavita prakash |
कवितेबद्दल –
मराठी कविता प्रकाश (marathi kavita prakash) ही कविता आयुष्यावर आधारित आहे. या कवितेच्या माध्यमातून प्रकाशाने अंधारावर केलेली मात अधोरेखित करण्यात आली आहे.
Marathi kavita prakash |
मराठी कविता – अंधाराकडून प्रकाशाकडे
कातळाचा काळोख दिसला जरी काळा
कातळाच्या काळोखाला प्रकाशाचा प्रखर वेढा
कातळाचा काळोख वेढला गेला मला
प्रकाशाचा दिप मात्र आहे पेटून उठला
कातळाचा काळोख आहे रोखून बघतो
प्रकाशाचा दिप मात्र त्याला मुठीत धरतो
जरी असला तु कातळाचा काळोख
पण माझ्या प्रकाशाचा अनुराग तुला पुरून उरतो
माहीत नाही किती वर्षे गेली या काळोख्यात
पण या काळोख्यानेचं दिली प्रकाशाची साथ
डोळे होते झाकलेले, काळोखाने घेरलेले
आयुष्याच्या वाटेवरती दिवे दिसले पेटलेले
प्रकाशाच्या दिव्याची मी झाले पणती
आयुष्यासाठी दिव्याला पणती भेटली सोबती
– कोमल जगताप