Marathi Kavita on Mind | मन मराठी कविता | मनावर कविता | Marathi Kavita

मन मराठी कविता  | मनावर कविता |  Marathi Poem on Mind | Marathi Kavita


मनावर कविता | marathi kavita on mind | marathi poem on mind
 Marathi kavita on mindकवितेबद्दल –


मराठी कविता थांबना रे मना (marathi kavita on mind) ही कविता मनावर आधारित आहे. मन हे किती चंचल आहे अगदी फुलपाखरांसारखे फुलपाखरू जसे एका फुलांवरुन दुसऱ्या फुलांवर काही क्षणात पलायन करत असते. तसेच, मन विचारांमध्ये अगदी बुडून गेलेले असते एका विचारातून दुसऱ्या विचारात. थांबना रे मना ही कविता मनावर आधारित आहे. 
मनावर कविता | marathi kavita on mind | marathi poem on mind
     Marathi kavita on mindमनावर आधारित कविता – थांबना रे मना 


थांबना रे मना 
बैसना रे जरा

किती सैरवैर धावशील 
कधी पेरुच्याबागा, 
कधी सिताफळाच्या बागा
ऐकना रे जरा
बैसना रे जरा

पडेल विश्व छोटे
विचार फार मोठे
ऐकना रे जरा
बैसना रे जरा

मी तर आहे एकटी घरा
नाही कोणी बोलाया जरा
तु तरी थांबना रे जरा
ऐकना रे जरा
बैसना रे जरा

खायला उठे घर सारे
पणं नाही ऐकायला कोणी घरा
म्हणून सांगे मी बार-बार
ऐकना रे जरा
बैसना रे जरा

बोलू बरसं काही
भरवू गप्पांची  मैफील
म्हणून बोले मी बार-बार
पणं नाही ऐकायला तु तयार
ऐकना रे जरा
बैसना रे जरा
थांबना रे मना
 
           – कोमल जगताप

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***0 thoughts on “Marathi Kavita on Mind | मन मराठी कविता | मनावर कविता | Marathi Kavita”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *