Marathi Kavita on Thoughts | Vichar Marathi Kavita
लढाई विचारांची…
लढाई आहे माझी जगण्याची
लढाई आहे माझी विचारांशी, विचारांची…
लढाई आहे माझी प्रकाशासाठी
लढाई आहे माझी अंधाराला मिटवण्यासाठी…
मला हवयं जगण्याचं स्वातंत्र्य
मला हवयं विचाराचं स्वातंत्र्य, मला हवयं स्व:ताला मांडण्याच स्वातंत्र्य…
ही लढाई आहे फक्त विचारांशी, विचारांची…
जन्मापासून दाबून-दाबून भरले माझ्यात व्यर्थ असे विचार
त्याला मिटवायला लढाई माझी स्व:ताशी, स्व:ताची…
मेलेला माणूस विचार करत नाही, मेलेला माणूस हलचाल करत नाही
पण,मी आहे जिवंत माणूस मला हवयं स्वातंत्र्य स्व:ताच्या पद्धतीने जगण्याचं…
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मी जरी धावलो, तरी मला आहे अधिकार स्व:ताला मांडण्याचा
तरी मला आहे अधिकार स्व:ताच्या पद्धतीने जगण्यांचा…
प्रवाहाच्या दिशेने मी जर धावलो,तर करतील माझा जयजयकार
पणं गेलो मी विरूद्ध दिशेने तर का? रोखून धरतात माझ्यावर तलवार…
ही तर लढाई आहे फक्त विचारांशी, विचारांची…
मी ही आहे तुमचाचं भुमीपुत्र, मी ही बघतो रोज स्वप्न नव्या भारताचं, नव्या युगाचं, नव्या विचाराचं…
मी ठेवतो विश्वास जे दिसेल मला माझ्या डोळ्यानी, जे प्रत्यक्ष ऐकेन मी माझ्या कानांनी…
ही तर लढाई आहे फक्त विचारांशी, विचारांची…
– कोमल जगताप