Mulgi Bolate Kavita in Marathi | Marathi Kavita for Mulgi
कवितेबद्दल :
Mulgi kavita in marathi ही एक मराठी कविता आहे तसेच ही कविता स्वलिखीत आहे. तसेेच, जीवनामध्ये बघीतलेले खुप सारे प्रसंग ज्या प्रसंगामध्ये मुलीच्या जन्माला दिलेला नकार या कवितेच्या माध्यमातून रेखाटण्यात आलेला आहे.
आई-बाबा मी तुमची मुलगी बोलते!
का? का? का?
का? लावलायं माझ्या जन्माचा खेळ
का? जन्माला यायच्या आधी बसेना तुमच्या अपेक्षांना मेळ
मी ही आहेना तुमच्या रक्तांमासांत सामावलेली
का? माझ्यांकडे बघतांय परक्या नजरांनी
का? माझ्या जन्माचा केलायं विकार
का? जन्माला यायच्या आधी देतायं मला नकार
मलाही यायचयं या जगात
बघायचेत सुर्य, चंद्र अन् तारेही
मी तारा तुमच्या नजरेचा
घेऊदया झेप, उंच, भरारी
नका करू माझ्या जन्माचा तिटकारा
मी तर आहे तुमची नवचैतन्याची धारा
नका डांबू मला कोठडीत
मोकळा श्वास आहे माझ्या मुठीत
येऊद्या माझ्या पंखात बळ
घेईल मी मुठीत जग
नका ठेऊ मला पडद्यामागे
काळाचा मागोवा येतोय मागे मागे
–कोमल जगताप
mulgi kavita in marathi
Ka? Ka? Ka?
Ka? Lawalay majhya janmacha khel
Ka? Janmala yaychya aadhi basena tumchya apeshanna mel
Mi hi aahena tumchya raktamasat samavaleli
Ka? Mahjyakade baghatay parkya najrani
Ka? Majhya janmacha kelay veekar
Ka? Janmala yaychya aadhi detay mala nakar
Malahi yaychay ya jagat
Baghaychet surya, chandra ana tarehi
Mi tara tumchya najrecha
Ghevudya jhep, unch, bharari
Naka karu majhya janmacha teetkara
Mi tar aahe tumchi navchaitanyachi dhara
Naka dambu mala kothadit
Mokala shwas aahe majhya muthit
Yevudya majhya pankhat bal
Gheyil me muthit jag
Naka thevu mala padadya mage
Kalacha magova yetoy mage mage.
-KOMAL JAGTAP