Marathi Kavita Phulpakharu | Prem Kavita
marathi kavita phulpakharu love poem |
कवितेबद्दल :
Marathi kavita fulpakhru ही एक मराठी कविता आहे. Phulpakhru ही कविता स्वलिखीत आहे. फुलपाखरू कविता मानवी आयुष्यावर आधारित आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी प्रेमाचा बहर येतो. मन अगदी फुलपाखरांसारखे बागडू लागते. अशाच एका मनाच्या बागडण्याला शब्दाच्या जाळ्यात बांधुन ठेवले आहे.
marathi kavita phulpakharu love poem |
मराठी कविता – फुलपाखरू
भिरभिरले हे मनं
फुलपाखरू होऊनं,
कुणाच्या शोधातं
न कळे आतलें आत
फुलपाखरू शोधतयां फुलं
गंध चाखायला
मन झाले हे बावरे
गुंतुन पडायला
ध्यास लागलियां फुलां
फुलपाखरू येईलं
माझ्याकडे बघुन नजरेने
चुंबन घेईलं
नजरेने त्याच्या सोडलायं बाण
हृद्याला माझ्या टाकलयं चिरुन
रोज-रोज नजरेची लागली चाहुल
मन ही माझे गेलियां भुलुन
एकेदिवशी अचानक तोडले ते फुलं
फुलपाखरू बिचारे अजुनी घिरट्या घेतयं
आहे आस धरुनी अजुन
येईलं माझी फुलराणी मजं भेटायला आज
– कोमल जगताप
marathi kavita phulpakhru
Bhirbhirale he man
Phulpakharu hoyun,
Kunchya shodhyat
Na kale aatale aat
Phulpakharu shodhataya phul
Gandh chakhayala
Man jhale he bavare
Guntun padayala
Dhyas lagliya phula
Phulpakharu yeyil
Majhyakade baghun najarene
Chumban gheyil
Najarene tyachya sodalay ban
Hradayala majhya takalay Chirun
Roj-roj najarechi lagli chahul
Man hi majhe geliya bhulun
Ekedivashi achanak todale te phul
Phulpakharu bichare ajun ghirtya ghetay
Aahe aas dharuni ajun
Yeyil majhi phulrani maj bhetayala aaj.
– KOMAL JAGTAP
कवितेबद्दल स्पष्टीकरण :
प्रत्येकाला भर तारूण्यात आपल्या जोडीदाराची आस लागलेली असते. कुणाचे प्रेम सार्थ होते तर कुणाचे आठवणींमध्ये जिवंत राहते. फुलपाखरू या कवितेमध्ये याच प्रेमाच्या आठवणींना उतरवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. फुलपाखरू ही कविता तुम्हाला नक्कीचं आवडली असेल अशी आशा करते आणि निरोप घेते.
धन्यवाद!!!
कोमल जगताप.
Also Read This Poems: