Swapn Marathi Kavita Komal Jagtap
स्वप्न मराठी कविता – सारं सारं काही करावसं वाटतं
सारं सारं काही करावसं वाटतं…
स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…
बागेतलं फुल होऊन झुलावसं वाटतं…
इवल्या इवल्या फुलासोबत गावसं वाटतं…
त्याचा रंग पाहूनी मलाही फुलावसं वाटतं…
सारं सारं काही करावसं वाटतं…
स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…
स्वप्नाच्या दुनियेतली मीच माझी स्वप्नपरी
हरवूनी जाते मी प्रत्येक क्षणोक्षणी…
माझ्या या स्वप्नांचा मिच बांधील बंगला
आकाशातील चांदण्यावरती झुला माझा झुलला…
इवले इवले पंख बांधूनी जाईल मी दूर आकाशी
चांदण्या आणि चंदाशी खेळीन मी लपाछपी
सारं सारं काही करावसं वाटतं…
स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…
मोरपिसारा लावूनी बनात नाचावसं वाटतं…
पाऊस आला, पाऊस आला रिमझिम करीत तालात…
त्याच्यासोबत रूणूझुणू रूणूझुणू नाचावसं वाटतं…
दूर दूर आकाशी उडावसं वाटतं…
सारं सारं काही करावसं वाटतं…
स्वप्नाच्या दुनियेमध्ये दूर दूर उडावसं वाटतं…
-कोमल जगताप