Marathi Prem Kavita for Girlfriend | Love Poem Marathi

Marathi Prem Kavita for Girlfriend | Love Poem Marathi

 
 
 
 
Marathi prem Kavita for girlfriend
 Marathi prem Kavita for girlfriend

 

 
 
 
 
 
मी दारावरून जेव्हा तुझ्या 
प्रेम
साथसोबत
आयुष्याच्या पानावरती
मन हे बावरे 
 
 
 
 
 
 
 
Marathi prem Kavita for girlfriend
 Marathi prem Kavita for girlfriend

 

 
 
 
 

मी दारावरून जेव्हा तुझ्या

 
मी दारावरून जेव्हा तुझ्या
स्वतःला परजत
गर्जत गडगडत भरून आलो
तू तेव्हा
किनाऱ्याला अनोळखत
हसत हसत ओहटत होतीस
 
मी दारावरून जेव्हा तुझ्या
पाऊस थोपवत
ढगांसारखा भटकून गेलो
तू तेव्हा
मेहंदीभरल्या हातावर
चंद्र वाळवत होतीस
 
मी दारावरून जेव्हा तुझ्या
आवंढ्यात उद्रेक गिळून
दूरच्या हाकेसारखा खोल कुठे विरून गेलो
तू तेव्हा
पैंजणाच्या रुणझुण तालात
जिना चढत होतीस
 
           कवी – नागराज मंजुळे
 
 
 
 
 
 

प्रेम

 
” माझं तुझ्यावर प्रेम आहे ! ”
 हे सांगण्याअगोदरचं , 
 डोळे माझे सांगुनी गेले…
 
” माझा तुझ्यावर जीव जडला आहे ! “
 हे सांगण्याअगोदरचं , 
 काळीज माझे गळूनी गेले… 
 
 डोळे डोळयांशी बोलूनी गेले… 
 एकमेकांची भाषा समजूनी गेले… 
 
 का कुणास ठाऊक…? 
 मन माझे दिवसा-ढवळ्या तुझ्याचं स्वप्नामध्ये का रमूनी गेले… ? 
 
 फुलपाखरू होऊनी
 मन माझे तुझ्याचंपाशी हरवूनी गेले … ? 
 
 हद्यामध्ये का कुणास ठाऊक
 ओढ मला तुझीच लागते…? 
 
 माझे मन तुझ्याचंपाशी 
 येऊनी का रमते…? 
 
 जग आता मला कसे हे
 वेगळेचं भासते… 
 
 पऱ्यांच्या दुनियेतील तु 
 मला माझी सोनपरी वाटते… 
 
 माझ्या या भावनांना
 तुच सांग आवर कसा घालू… 
 
 तुझ्याचं सोबत प्रत्येकक्षणी 
 हरवून कसा जावू… 
 
 प्रेमाच्या या झाडावर
 दोन पक्षी बसले… 
 
 हळुहळू मधूर गाणे
 कुणीतरी ऐकले… 
 
 डोळे भरूनी तुलाच पाहू
 आठवणींमध्ये तुझ्याचं मी बुडूनी जावू… 
 
 जाग येताच क्षणी
 चाहूल मला तुझीचं लागते… 
 
 तुच सांग या वेड्या मनाला
 प्रेमाचे गीत कोण कुणासाठी गाते… 
 
     
 
 
 

मराठी प्रेम कविता – साथसोबत

 
आस आहे, ध्यास आहे
जगण्यासाठी तुझी साथ आहे…
 
हवा आहे, पाणी आहे
जगण्यासाठी तुझी साथ आहे…
 
ऊन आहे, वारा आहे
सुर्य आहे नि, तारा आहे
तु सोबत असताना 
जीवनाला नवी दिशा आहे…
 
आकाश आहे, भूमी आहे
समुद्र आहे नि, किनारा आहे
तुझ्या सोबत जगताना
सारे काही ठीक आहे…
 
तु आहे, मी आहे
आपण सारेचं आहोत
पण तुझ्या सोबत जगताना
जीवणात माझ्या आनंद आहे…
 
तु सोबत असताना
तु माझी आहे नि, मी तुझा आहे…
 
              
 
 
 

मराठी प्रेम कविता – मन हे बावरे

 
मन का कुणास ठाऊक 
होते हे बावरे…
तुला पाहण्यासाठी 
नजरेला बोलले…
नजर ही खिन्न होऊनी 
तुलाचं पाहते…
नजरे आडूनी मन का 
बाण सोडते…
मन का कुणास ठाऊक 
होते हे बावरे…
तुझ्याशी बोलण्यासाठी 
शब्दही घेतात आढेवेढे…
नजरही करते बारा नखरे
कधी लाजते, तर कधी धीट होऊनी न्याहाळते…
मन का कुणास ठाऊक 
होते हे बावरे…
हातात हात गुंफण्यासाठी 
हात भारी कापले…
एक एक शब्द निघतो
धीट होऊनी बाहेर जसा
पण समोरची कोकिळा ही लाजते…
मन होते हे बावरे…
पण समोर पाहताक्षणी
डोळेही होतात बावरे…
                      
 
 
 
Marathi prem Kavita for girlfriend
 Marathi prem Kavita for girlfriend

 

 

 

 
 

मराठी प्रेम कविता – आयुष्याच्या पानावरती

 
तुझा प्रत्येक क्षण माझ्यासाठी फार खास आहे…
तुझी प्रत्येक आठवण ही माझी आठवण आहे…
तुला पडलेले स्वप्न हे माझे स्वप्न आहे… 
माझ्या आयुष्याच्या पानावरती नाव फक्त तुझेचं आहे…
माझ्या आयुष्याच्या पानावरती नाव फक्त तुझेचं आहे…
 
                  

 

 

मराठी प्रेम कविता खास व्हॅलेंटाइन्स डे स्पेशल दिवशी करा प्रपोज आपल्या प्रिय व्यक्तीला .

व्हा व्यक्त मराठी प्रेम कवितांच्या साहाय्याने आणि सांगुन टाका मनातले सारे काही आपल्या प्रिय व्यक्तीला या कविता खास तुमच्यासाठी.

 
 
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top