Aai Kavita in Marathi | Aai Marathi Kavita

Aai Kavita in Marathi | Aai Marathi Kavita

 

 

आई मराठी कविता | aai kavita marathi

                                                                                                                               Aai kavita

कवितेबद्दल –

मराठी कविता नातं तुझं माझं ही कविता आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. 

या कवितेमध्ये माय लेकीचे नाते अधोरेखित करण्यात आले आहे. 

तसेच आईविषयीच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. 

नातं तुझं माझं – आईवर आधारित कविता

नातं तुझं माझं जणू

आभाळ  माझ्या सोबतीला

 

नातं तुझं माझं जणू

गगन आलं माझ्या भेटीला

 

नातं तुझं माझं जणू

पाण्यात पडलेलं स्व:ताचं प्रतिबिंब

 

नातं तुझं माझं जणू

नाव नसलेलं स्व:ताचं अस्तित्व

 

नातं तुझं माझं

देठाला उमलू लागलेलं ते कोवळं फुलं

 

नातं तुझं माझं

चुलीवर बसलेलं ते हागरं मुलं

 

नातं तुझं माझं

एकमेकांत गुंतलेलं, कुणीही नं पाहिलेलं, कुणीही नं अनुभवलेलं

 

नातं तुझं माझं

पहिल्या धारेचं दुध प्यायलेलं

 

नातं तुझं माझं तुच सांग कशासारखं,

सशासारखं, की माश्यासारखं… 

 

की त्याहीपेक्षा वेगळं

एकाच धाग्यात ओवलेलं

 

नातं तुझं माझं मी पाहिलेलं

आणि तु अनुभवलेलं… 

 

कोमल जगताप

 

 

 

अजून मराठी कविता वाचा :

मराठी कविता अन्न

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top