children’s poem in marathi | kids poems in marathi

children’s poem in marathi | kids poems in marathi

 
 
 
 
children's poem in marathi | kids poems in marathi | lahan mulansathi kavita
kids poems in marathi
 

कवितेबद्दल –

 

मराठी बाल कविता माकडांची शाळा ही कविता ही लहान मुलांसाठी लिहिली गेली आहे. या कवितेच्या माध्यमातून माकडांचे उपहासात्मक वर्णन केले गेले आहे. 

 
 
 

माकडांची शाळा – मराठी बाल कविता

 
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
 
माकडांच्या शाळेत नसतो कोणी मास्तर |
इथे सर्वचं समजतात स्वतःला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ||
 
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
 
माकडांच्या शाळेत नसतात कधीच पाडे |
इथे असतात फक्त उड्यांचे धडे, उड्यांचे धडे ||
 
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
 
 
 
 
 
children's poem in marathi | kids poems in marathi | lahan mulansathi kavita
children’s poem in marathi 

 

 
 
 
 
माकडांच्या शाळेत नसतात चार भिंती | 
माकडांची शाळा भरते जिथे असते माणसांची वस्ती ||
 
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
 
माकडांच्या शाळेत नाही चालत पाटी |
माकडांच्या शाळेत शिकवतात भुक आहे मोठी, भुक आहे मोठी ||
 
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
 
  – कोमल जगताप
 
 

 

 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top