मराठी बाल कविता माकडांची शाळा ही कविता ही लहान मुलांसाठी लिहिली गेली आहे. या कवितेच्या माध्यमातून माकडांचे उपहासात्मक वर्णन केले गेले आहे.
माकडांची शाळा – मराठी बाल कविता
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
माकडांच्या शाळेत नसतो कोणी मास्तर |
इथे सर्वचं समजतात स्वतःला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ||
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
माकडांच्या शाळेत नसतात कधीच पाडे |
इथे असतात फक्त उड्यांचे धडे, उड्यांचे धडे ||
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
children’s poem in marathi |
माकडांच्या शाळेत नसतात चार भिंती |
माकडांची शाळा भरते जिथे असते माणसांची वस्ती ||
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
माकडांच्या शाळेत नाही चालत पाटी |
माकडांच्या शाळेत शिकवतात भुक आहे मोठी, भुक आहे मोठी ||
माकडांची शाळा बाई, माकडांची शाळा |
फार गं भारी ही माकडांची शाळा ||
– कोमल जगताप