Kids Poems in Marathi | Poems in Marathi for Kids | Marathi Poems for Kid

Kids Poems in Marathi | Poems in Marathi for Kids | Marathi Poems for Kid Kids Poems in Marathi, Poems in Marathi for Kids, Marathi Poems for Kid, Marathi Bal Kavita

कवितेबद्दल – 

नमस्कार मित्रांनो 🙏🙏🙏
आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठी बालकविता या सर्व कविता लहान मुलांसाठी लिहिलेल्या आहेत. 
लहानपणीचे दिवस आठवले की आपल्यासमोर दंगामस्ती, खोडकरपणा, खट्याळपणा तसेच निरागसपणा आपल्या डोळयासमोर तरळू लागतो. 
Kids Poems in Marathi, Poems in Marathi for Kids, Marathi Poems for Kid, Marathi Bal Kavita आपणास येथे मिळतील. 

मराठी बाल कविता – या रे या… सारे या… 


Kids Poems in Marathi, Poems in Marathi for Kids, Marathi Poems for Kid, Marathi Bal Kavitaया रे या… सारे या… 
गप्पागोष्टी मारुया… 
या रे या… सारे या… 
खोड्या आपण काढूया… 
या रे या… सारे या… 
पकडा पकडी खेळूया… 
या रे या… सारे या… 
पाटीवरती पेन्सिल गिरवूया… 
या रे या… सारे या… 
जोरजोरात उड्या आपण मारुया… 
या रे या… सारे या… 
मस्तीची शाळा भरवूया… 
या रे या… सारे या… 
हसत खेळत गाणे आपुले गाऊया… 
– कोमल जगताप
मराठी बालकविता – या रे या… सारे या…या कवितेच्या 
माध्यमातून लहान मुलांना इतर मुलांसोबत त्याच्या मित्रमैत्रिणी सोबत खेळण्याचा तसेच अभ्यास करण्याचा सल्ला देत आहे. 

मराठी बाल कविता – बहीण माझी छोटीशी


Kids Poems in Marathi, Poems in Marathi for Kids, Marathi Poems for Kid, Marathi Bal Kavita

बहीण माझी छोटीशी
हसते किती छान छान…
मी तिचा दादा आहे 
फिरवितो तिला लांब लांब… 
आमची आहे छान छान
गट्टी आता जमली … 
छोटीशी बहीण माझी
घसरून धपकन पडली… 
मी तिला रोज रोज 
गाणी शिकवितो छान छान… 
पण बहीण माझी खोडकर
खोडी काढते फार फार… 

– कोमल जगताप


मराठी बाल कविता – बहीण माझी छोटीशी ही कविता भावा – बहीणीचे प्रेमळ तसेच खोडकर नाते अधोरेखित करत आहे. 

हे देखील वाचा : 

मराठी बाल कविता – माकडांची शाळा

मराठी बाल कविता –  वारा आहे गार गार


Kids Poems in Marathi, Poems in Marathi for Kids, Marathi Poems for Kid, Marathi Bal Kavita
वारा आहे गार गार
चांदोमामा गोल गोल 
आभाळाच्या चादरीला 
पडले आहे बोळ बोळ 
चांदणी आहे लुकलुकती 
माझ्यासंगे रोज बोलती 
आपण दोघे बसू आता
तुझ्याच छोट्या पंतगावरती
– कोमल जगताप
मराठी बाल कविता –  वारा आहे गार गार ही कविता लहान मुलांच्या कल्पना अधोरेखित करत आहे. 
या सर्व मराठी बाल कविता आपणास आवडल्या असतील ही आशा. या सर्व मराठी बाल कविता आपणास कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा. धन्यवाद….. आपण मनातलं कागदावर मराठी कविता संग्रह या वेबसाईटला भेट दिली. Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *