Romantic Marathi Prem Kavita for Husband

Romantic Marathi Prem Kavita for Husband

Marathi Poems for Husband | Romantic Marathi Prem Kavita for Husband | Marathi Kavita on Life Partner

कवितेबद्दल-

नमस्कार, मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये आपले मनापासून खुप खुप स्वागत.
आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत नवऱ्यासाठी मराठी प्रेम कविता, marathi kavita for husband, marathi poems on husband, romantic poems for life partner in marathi, prem kavita for husband. 
 
 

*** नवऱ्यासाठी मराठी प्रेम कविता ***

मला कापले पण तुझ्या डोळ्यात पाणी कसे रे…!!!
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला…
दोन जीव वेगवेगळे पण काळीज कसे एक झाले…!!!
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला…
आठवणीची साठवण माझ्या मनी, तुझ्याच येण्याने खुलते माझ्या गालावरी खळी…!!!
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला…
माझ्या या भावना मी शब्दांनी का तोलते…???
तुझे मुके बोल कळू दे रे मला…
सांग ना या साऱ्याचे गुपीत मला…
***********************************
जोडीदार आयुष्याचा तु माझ्या
जगण्याला माझ्या देतोस तु नवी दिशा…
साथ सोबत असतो माझ्या तु सदा
तुझीच साथ पल्लवित करते नवीन आशा…
आयुष्य माझे सारे तुझ्या सोबतचं असावे
प्रत्येक संकटाला तुझा हात माझ्या हाती असावा..
भिडण्या मग सदा या नव्या जगाला
भय आता कसे वाटेल या जीवाला…
***********************************
एकांतात बसले असले मी जरी
तुझेच बोल रेखाटते कागदावरी …
असण्याची चाहुल भासते सदा
अंगणी मोराचा पिसारा रेखाटते
जसाच्या तसा…
***********************************
आयुष्याची सुरुवात केली मी तुझ्यासोबत
जीवनाला नवीन दिशा मिळेल तुझ्यासोबत…
मिळेल अर्थ माझ्या जगण्याला
मिळेल साथी हाती हात गुंफण्याला…
***********************************
एकांतातले माझे मधूर गाणे
मी गुणगुणत असते सदा…
माझ्या या गुणगुण गाण्याला
तुच तार छेडीतो सदा…
***********************************

हे पण वाचा :

नवऱ्यासाठी मराठी प्रेम कविता या सर्व प्रेम कविता आपणास कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा. तसेच आपल्या सुंदर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. ज्यामुळे आपण मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाइटला भेट दिली हे आम्हांस सुचीत होईल.
आपणास अजून विषयावर मराठी कविता हव्या असतील तर आम्हांस नक्की कळवा आम्ही आपली मागणी पूर्ण करण्याचा सफल प्रयत्न करू.
नवऱ्यासाठी मराठी प्रेम कविता या कवितांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या भावना नक्कीच सांगतील ही आशा.
अशाच नवनवीन मराठी कविता वाचण्यासाठी मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका. आम्ही आपली पुन्हा वाट बघत आहोत.
धन्यवाद !!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top