Baba Mala Shikudya Marathi Kavita
मराठी कविता – बाबा, बाबा मला शिकू द्या !!!
बाबा, बाबा मला शिकू द्या…
आयुष्याचे मोती, मोती मला वेचू द्या…
बाबा, बाबा मला शिकू द्या…
या वयात बाबा, बाबा मला नाही लग्न करायचं…
माझं बालपण आहे बाबा मला जगायचं…
बाबा, बाबा मला शिकू द्या…
आयुष्याचे मोती, मोती मला वेचू द्या…
येवढ्या लवकर बाबा मला नका, नका संसारात रेटू…
लहानसा कोवळा जीव बाबा नका, नका आवताला जुपू…
बाबा, बाबा मला शिकू द्या…
आयुष्याचे मोती, मोती मला वेचू द्या…
पै पै करून बाबा तुम्ही आहे पैसा उभा केला…
माझा संसार उभा राहो म्हणून स्वतः आहात झिजला …
पण बाबा, बाबा मला आहे शिकायचं…
माझं आयुष्य आहे मला पुढे रेटायचं…
बाबा, बाबा मला शिकू द्या…
आयुष्याचे मोती, मोती मला वेचू द्या…
शिक्षणचं आहे बाबा जे तुम्हा मला न्याय देईल…
आयुष्याला आपल्या तेच हो मोठा आधार देईल…
म्हणून बाबा, बाबा मला शिकू द्या…
आयुष्याचे मोती, मोती मला वेचू द्या…
– कोमल जगताप
कवितेबद्दल-
मराठी कविता – बाबा, बाबा मला शिकू द्या या कवितेमध्ये एक मुलगी आपल्या बाबांना आर्जव करत आहे की बाबा मला शिकू द्या.
कोरोना काळामध्ये समाजामध्ये खुप मोठ्या प्रमाणावर बालविवाह झाले. आर्थिक चणचण, बेरोजगारी या सर्व असंख्य प्रश्नांमुळे खेडेगावांमध्ये बालविवाह सारखी प्रकरणे सामोर आली. ज्या वयात मुलांना आयुष्य म्हणजे काय? लग्न म्हणजे काय? या प्रश्नाची उत्तरे ही माहीत नाहीत अशा वयात त्यांना संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये अडकवले जात आहे आणि त्याचा परिणाम मुलांपेक्षा मुलीवर मोठ्या प्रमाणात होत आहे.
या कवितेमध्ये मुलीची शिक्षणासाठीची आस रेखाटण्यात आली आहे. एका अभ्यासू तसेच जिद्दी मुलीचे वर्णन या कवितेमध्ये केले आहे.