Marathi Kavita Mukhavata | New Marathi Poems
कवितेबद्दल –
मराठी कविता मुखवटा ही कविता माणसांमधली माणूसकी हरवत चालली आहे याचा दाखला देत आहे.
तसेच, त्यामुळे माणसां-माणसां मध्ये निर्माण होणारा दुरावा आणि त्यामुळे बदलत चाललेली नाती अधोरेखित करण्यात आली आहेत.
marathi kavita mukhavata |
मुखवटा मराठी कविता
मुखवटा घेऊनी फिरती दुनिया
ना कधी कुणाला समजली
मुखवट्यां मागे खरा चेहरा
ना कधी कुणाला उमगला
जरी उमगला तरी नाही अट्टाहास केला
मुखवट्यांला खरे समजूनी जयजयकार केला
जिभेवरती गोड, पोटांमध्ये कडू
चेहऱ्यावर हास्यआबांट, मनामध्ये तिखट
ना कधी उकले कुणाला
मैत्री म्हणुनी केली
तो शत्रू बनूनी गेला
मैत्रीचा गळा दाबूनी
धुंतला तांदळु बनला
मी तुझ्यापाठी म्हणुनी
पाठी वार केला
आता वाटते नको ही मैत्री
जिथे फक्त आणि फक्त कटूता उरली
– कोमल जगताप