Sad Kavita Marathi | Dukha Kavita Marathi

Sad Kavita Marathi | Dukha Kavita Marathi

Sad Marathi Poem | Marathi Sad Kavita | Dukh Kavita Marathi

दुःख मराठी कविता

सोडून दे, सोडून दे,
दे सोडून सारं…
ज्याच्यामुळे तुझ्या डोळ्यात
फक्त आणि फक्त अश्रूचं येणार आहेत…
जे नाही तुझ्याजवळ
त्याच्यासाठी तु रडतीयेस,
पण आहे जे तुझ्याजवळ
ते मात्र तु विसरतीयेस…
सोडून दे, सोडून दे,
दे सोडून सारं…
बालपण तुझं सारं
या दु:खामुळेच कोमेजलं…
हिरवंगार रोप लहानपणीचं
होरपळलं…
सोडून दे, सोडून दे,
दे सोडून सारं…
आता तरी सांग या दु:खाला
तु कोमेजणार नाहीस…
दु:खाचा डोंगर आता तु
चढणार नाहीस…
त्याला उत्तर दे… !!!
घाबरून अंधाराला रडत बसू नकोस…
आणि उगवलेल्या कोंबाला
लहानपणीचं मोडू देऊ नकोस…
म्हणून,
सोडून दे, सोडून दे,
दे सोडून सारं…
दु:खाच्या या काळया डोहातून
तुला बाहेर पडायचयं…
येणाऱ्या प्रकाशाला तुला
मिठीत घ्यायचयं…
त्यामुळे,
सोडून दे, सोडून दे,
दे सोडून सारं…
– कोमल जगताप

कवितेबद्दल :

 
मराठी कविता दु:ख ही कविता दु:खावर आधारित आहे. मराठी कविता दु:ख या कवितेच्या माध्यमातून दु:खातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखाचा-दु:खाचा प्रवास सतत चालू असतो. पण काही लोक लवकर या दु:खाचा स्विकार करत नाहीत सत्यापासून खुप दुर पळतात आणि स्वतःचे आयुष्य अंधकारमय करून टाकतात.
काळाची चाके ही नेहमी पुढे चालत असतात त्यांना मागे फिरणे माहीत नसते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हे फार खास आणि मोलाचे असतात त्याचे मुल्ये आपण जाणले पाहिजे. दु:खावर मात केली पाहिजे. आयुष्यातील येणाऱ्या संधीचा वापर केला पाहिजे ना की काळाच्या गर्तेमध्ये आपले चाक रोवून दिले पाहिजे.
या कवितेमध्ये हाच आशय मांडण्यात आला आहे. एका निकटच्या व्यक्तीच्या जीवनातील दु:खाचे लहानपणापासून निरीक्षण नोंदवून मार्गदर्शन केले आहे.
 
मराठी कविता दु:ख  आपणास आवडेल व आपणही आपल्या आयुष्याचा लढा निर्भीडपणे लढतील ही आशा… धन्यवाद !!!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top