Best Marathi Kavita on Life | New Marathi Poems
Marathi Kavita on Life |
कवितेबद्दल –
मराठी कविता जीवन (marathi kavita on life) ही कविता निराशेचे जगणे सोडून आजूबाजूची दुनिया किती सुंदर आहे हे दर्शवते आहे. तसेच, ही कविता डोळसवृत्तीने आयुष्याकडे पाहायला सांगते आहे. ही कविता जीवनांवर आधारित आहे .
Marathi Kavita on Life |
उघड जरा हे पडदे !
उघड जरा हे पडदे
बघ बाहेर किती प्रकाश आहे
बघ डोकावून जरा मनांमध्ये
अंधार किती दाटला आहे
बघ जरा या आभाळांकडे
सुर्य माथ्यावर आला आहे
बघ जरा हा थवा
आकाशाला कुरवाळत आहे
बघ जरा हे पक्षी
गाणे कसे गुणगुणत आहेत
अनुभव जरा हा वारा
तुझ्याशी काहीतरी बोलत आहे
बघ जरा हे नभ
एकमेकांचा पाठलाग कसे करीत आहेत
बघ जरा हे तृण
तुझ्याकडे करूण नजरेने बघते आहे
बघ जरा हे ऊण
तुला भेटायला किती लांबून आले आहे
बघ जरा या झाडांकडे, या वेलींकडे
कसा सळसळ आवाज पाने करीत आहेत
बघ वाकून ही काळी माती
जन्मांतराचे तुझे आणि तिचे नाते सांगत आहे
उघड जरा हे पडदे
बघ बाहेर किती प्रकाश आहे
उघड जरा हे पडदे
बघ बाहेर किती प्रकाश आहे
– कोमल जगताप