Marathi Viraha Kavita | Ek Hota Rajkumar Marathi Kavita

Marathi Viraha Kavita | Ek Hota Rajkumar Marathi Kavita

 
 
 
मराठी विरह कविता | virah poem in marathi | marathi virah kavita
     Marathi virah kavita
 
 
 

कवितेबद्दल –

 
एक होता राजकुमार ही एक विरह कविता आहे. या कवितेच्या माध्यमातून प्रेमाच्या मध्ये जो गरीब -श्रीमंत ,जाती-धर्म असा भेदभाव येतो आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो तो स्पष्टपणे रेखाटण्यात आला आहे. 
 
 
 
 
मराठी विरह कविता | virah poem in marathi | marathi virah kavita
       Marathi virah kavita

मराठी विरह कविता – एक होता राजकुमार 

 
 
एक होता राजकुमार…
तिच्यावर खुप प्रेम करायचा
रोज नजरेने तिच्याशी
गप्पा मारायचा
तिने ही हेरले होतं की, 
हाच राजकुमार तिला रोज तिच्या स्वप्नांत भेटायचा
पण, प्रत्यक्षात मात्र कधी तिच्या समोरचं नाही यायचा
एक दिवस मात्र आकस्मित घडलं
राजकुमारीला राजकुमाराचं प्रत्यक्षात दर्शन घडलं
ती मात्र गोंधळात पडली, 
लाजली, बावरली, हलक्या नजरेने पुन्हा: पाहू लागली
की हाचं तो राजकुमार तिला तिच्या स्वप्नांमध्ये भेटायचा… 
स्वप्न आणि सत्य याच्यामध्ये अंतर वाढलं… 
प्रत्यक्षात मात्र ती राजकुमारी भटकुरीण होती
मात्र स्वप्न राजकुमाराचं पाहत होती 
तिचं मात्र स्वप्न अर्धवट राहीलं…. 
एक होता राजकुमार
तिच्यावर खुप प्रेम करायचा…. 
 
– कोमल जगताप
 
 
 

***अजून कविता वाचण्यासाठी अवश्य भेट द्या ***

 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top