Marathi Kavita Nisarg | Nisargavar Kavita in Marathi
marathi kavita on nature |
कवितेबद्दल –
मराठी कविता धरत्रीच्या कुशीमधुनी एक कोंब अंकुरला (Nisarga Kavita in Marathi) ही कविता निसर्गावर आधारित आहे. या कवितेमध्ये कल्पनेला वाव देण्यात आला आहे. ही कविता पुर्णपणे कल्पनेवर आधारित आहे.
marathi kavita on nature |
धरत्रीच्या कुशीमधुनी एक कोंब अंकुरला…
धरत्रीच्या कुशीमधुनी एक कोंब अंकुरला…
उन्हं वाऱ्याचा मारा घेत ताठ मानेने उभा राहिला
त्याच्या उगमाचा सर्वांनाच हेवा वाटला
बधाई देण्यासाठी सारा अवकाश चांदणे शिंपित आला
जोडीला मामा म्हणून चंदालाही घेऊन आला
साऱ्या विश्वामध्ये एकच जल्लोष पसरला
याचा नाद दाही दिशांनी घुमू लागला
कारण फक्त एकच
धरत्रीच्या कुशीमधुनी एक कोंब अंकुरला…
झाडे-वेली, पक्षु-पक्षी, डोंगर, नदी-नाले, पर्वत, समुद्रंही मागे नं राहीला
धरत्रीच्या अंगनामध्ये साऱ्यानीचं खेळ मांडला
या खेळामध्ये असा काही नाद घुमला
मैत्रीच्या धाग्यांमध्ये कायमचा अडकून पडला
सूर्यदेव मात्र लांबूनच आर्शिवाद देत राहीला
धरत्रीच्या कुशीमधुनी एक कोंब अंकुरला…
– कोमल जगताप