मराठी कविता ओढ या कवितेमध्ये जीवन जगत असताना आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची ओढ, आस लागलेली असते. आपण आनंद शोधण्याच्या प्रयत्नात असतो. कधी सुखं तर कधी दु:ख या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये निरंतरपणे प्रवास चालू असतो. हाच आशय या कवितेमध्ये अधोरेखित करण्यात आला आहे.
ओढ मराठी कविता
ओढ असते या क्षणाला
भिरभिरावे पुन्हा: एकदा फुलपाखरू होऊन…
ओढ असते या पाखरांला
जावे फुलांमध्ये रमून…
विटून जातो हा क्षण
पुन्हा: येरझाऱ्या मारून…
घेऊन बसतो जवळ
दु:खाला कवटाळून…
हा असा खेळ आयुष्याचा
मुसाफिर एक वाटा अनेक…
गुंतून सारा संसार चाले
म्हणून क्षणाला पडते कोडे…
– कोमल जगताप