Sundar Marathi Paus Kavita

Sundar Marathi Paus Kavita

 
 
 
 
paus kavita in marathi | pausvar kavita in marathi | पाऊस कविता मराठी
पाऊस कविता मराठी 

कवितेबद्दल  :

 
मराठी कविता पाऊस ही कविता पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणावर आधारित आहे. तसेच पाऊस ही कविता स्वलिखीत आहे.
या कवितेच्या माध्यमातून विविध पक्षांचे तसेच पावसाच्या आगमनाचे वर्णन केले गेले आहे. मराठी पाऊस कविता खास माझ्या सर्व मराठी बांधवांसाठी तसेच माझ्या प्रिय वाचकांसाठी. तुम्हाला ही पाऊस कविता नक्कीच आवडेल अशी आशा करते. 
 
 
 
 
paus kavita in marathi | pausvar kavita in marathi | पाऊस कविता मराठी
पाऊस कविता मराठी
 
पाऊस कविता मराठी
 
नमली आहे सृष्टी | नमला सारा निसर्ग  ||
शमली आहे धरती | शमला सारा सजीव प्रपंच  ||
स्वागताला राजाच्या | वारा गातो आहे गाणी ||
मध्येच वीज कडाडते | सांगण्या राजाची कहाणी ||
सजली आहे सृष्टी | सजला सारा प्रपंच  ||
खेळ पाहण्या हा निसर्गाचा | जमला सारा देह प्रपंच ||
घेतो आहे विसावा | थकला तो तरुण पक्षी ||
झुकवूनी झाडाची फांदी | घेतला विसावा आसऱ्यासाठी ||
लगबगली ही धरती | राजाच्या स्वागताला ||
शमला तो वारा | पाहण्या दंगा हा पर्जन्याचा ||
न्हाली ही सृष्टी | टवटवीले ते झाड, हळूच प्रकाशाने वर काढली आहे मान ||
आज या निसर्गाने वेधले आहे साऱ्याचे लक्ष | असाही आहे मी म्हणूनी, मिरवतो आहे शान ||
लांब आहे तो निळसर पक्षी | लवती आहे झाडाची फांट्टी ||
गातो आहे गाणे | तो चतुर निळसर गोजिरा पक्षी ||
हिरवा तो पोपट मीट्टू, मीट्टु करतो आहे | मीही आहे असे सांगूनी गर्जना करतो आहे ||
कोकिळा आहे विसावली थकली, भागली, ती दमली | राजाच्या स्वागताला ती का कुणास ठाऊक मागे राहिली ||
अशा या सुंदर सौंदर्याने अप्सरा आहे प्रकटली | रिपरिप रिपरिप करून साऱ्या सृष्टीवर बरसली ||
 
– कोमल जगताप 
 
 
 
 
 

*** अजून मराठी कविता वाचा  ***

 
 
 
 
 
 
 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top