Shala Marathi Kavita | Best Kavita Shala

Shala Marathi Kavita | Best Kavita Shala

 
 
Shala Kavita in Marathi | Marathi Shala Kavita | Shala
shala marathi kavita
 
 
 

 कवितेबद्दल –

         मराठी कविता शाळा ही कविता शाळेतील जुन्या आठवणींवर तसेच कुमारवयातील जगण्यावर आधारित आहे. या कवितांच्या माध्यमातून शाळेतल्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. 
         कविता शाळा या दोन्हीही कविता स्वलिखीत आहेत. आयुष्यातुन निघून गेलेले शालेय दिवस स्मरणामध्ये जपुन ठेवण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये करण्यात आला आहे. 
 
 
 
 

मराठी कविता शाळा

 
शाळा  !!! 
शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला… 
पाठीवरती ओझे वाहुन मास्तरांचा मार खाल्लेला… 
कुणाच्या तरी प्रेमात बुडालेला… 
कुणाच्या तरी येण्याची वाट बघत रस्ता मध्येच चुकलेला… 
शाळा  !!! 
शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला… 
खंत त्या क्षणांची अजून जरा अनुभवावा… 
गोड त्या आठवणींना प्रेमाचा उबारा पुन्हा मिळावा… 
शाळा  !!! 
शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला… 
ती शाळा अजून आहे तशीच स्मरणात… 
त्या भिंती,  ते मैदान, ते शिक्षक सारं, सारं काही… 
पेपरचे मार्कस् कळण्याचा दिवस सारं, सारं काही… 
मैदानावरच्या उड्या, झाडांवरच्या सुर-पारंब्या सारं,  सारं काही आहे स्मरणात… 
शाळा  !!! 
शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला… 
नवं कोरं भविष्य गुढ होतं त्या क्षणात दडलेलं… 
पाटीवरच्या पाठीवरती नावं होतं कोरलेलं…शाळा  !!! 
आयुष्याचा खरा निरागस आनंद, चाहूल तारुण्यपणाची, 
ओढ जगण्याची, स्वप्ने ह्यदय घेऊन जाणाऱ्या पऱ्यांची… 
शाळा  !!! 
शाळा, हा विषय ज्याने त्याने अनुभवलेला… 
 
– कोमल जगताप
 
 
 
 
Shala Kavita in Marathi | Marathi Shala Kavita | Shala | school kavita in marathi
Shala Kavita in Marathi 

 

शाळा मराठी कविता

 
 
हे मेघा मझं घेऊन जाशील का रे ?  माझ्या त्या जुन्या शाळेम्हधी… 
ती शाळा ते वर्ग नाहीत रे आता तिथे… 
तिथे आहे एक भली मोठी इमारत… 
तिला पाहून मी म्हणते खरे माझी शाळा, पण खरं सांगू का ? मला ती माझी शाळा वाटतचं नाही…
माझी शाळा आता हरवली आहे माझ्याचं स्वप्नांमध्ये आणि प्रत्येकाच्या ह्यदयामध्ये… 
कोणी आणेल का शोधून तिला हो !  हो ! माझी शाळा… 
सर्व काही पुसलं गेलं आहे… 
सुंदर अशा कॅनव्हासवरती दुसरं चित्र उमटलं आहे,  रंगीबेरंगी रंग भरले गेले आहेत… 
आणि माझी शाळा त्याचं आवरणाखाली दडली आहे… 
हे मेघा मझं घेऊन जाशील का रे ?  माझ्या त्या जुन्या शाळेम्हधी…
हरवली आहे माझी शाळा याच पृथ्वीच्या गाभाऱ्याम्हधी… 
 
– कोमल जगताप
 
 
 
 

अजून मराठी कविता वाचा  : 

 
 
 
 
 

0 thoughts on “Shala Marathi Kavita | Best Kavita Shala”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top