Sad Poem on Women in Marathi | Marathi Sad Kavita on Women

Sad Poem on Women in Marathi | Marathi Sad Kavita on Women

Sad Poem on Women in Marathi | Marathi Sad Kavita on Women

मराठी कविता – चालते आहे ती…

चालते आहे ती…
जीव मुठीत घेऊन फिरते आहे ती… 
हो  !  हो  ! चालते आहे ती…
अडखळत, चाचपडत, धडपडत 
क्षीण झालेली ती… 
अजूनही चालते आहे ती…
शतकानुशतके आयुष्याचा भार
सोशिक होऊनि सोसती आहे ती… 
नजरेला नजर न भिडविता 
खाली मान घालून चालते आहे ती… 
हो  !  हो  ! जीव मुठीत घेऊन
जगते आहे ती… 
स्वत:शी, कुंटुबाशी, समाजाशी
रोजचं नव्याने भिडते आहे ती… 
लोकांच्या या बोचऱ्या नजरा 
झेलती आहे ती… 
परत पुन्हा: एकदा आयुष्याची लढाई
लढते आहे ती… 
आक्रोश मनात पेटता ठेऊन
मरण उराशी घेते आहे ती… 
प्रश्न मागे ठेऊन
असहाय्यतेने, रोज रोज मरते आहे ती…
– कोमल जगताप

कवितेबद्दल – 

मराठी कविता – चालते आहे ती… ही कविता महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. सध्या  समाज कितीही प्रगती करत असलातरी महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन गंज लागलेल्या बुद्धी प्रमाणेच आहे. 
समाजामध्ये वावरताना स्त्रियांना अजूनही खुप साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हाच आशय या कवितेमध्ये अधोरेखित केला आहे. 

अजून मराठी कविता वाचा  :


मराठी कविता संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *