How to write Marathi Kavita?

How to write Marathi Kavita?

How to write Marathi Kavita? | How to create Marathi Kavita ?

मराठी कविता कशी तयार करावी ? 

नमस्कार मित्रांनो, मी कोमल जगताप. मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये सर्वप्रथम आपले स्वागत करते.
 
मनातलं कागदावर – मराठी कविता संग्रह या नावाप्रमाणेच या वेबसाईटमध्ये मनातलं कागदावर लिहीण्याचा कवितेच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न केलेला असतो. तसेच मान्यवर कविच्या आवडलेल्या कविता या ब्लाॅगमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फार आतुर आहे. परंतु सुरुवातीला एक सांगणे या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून देण्याचा नक्की प्रयत्न करेल व तुमच्या प्रश्नाचे समाधान करण्याचा प्रयत्न.
खुप साऱ्या लोकांच्या मनामध्ये एक न्युनगंड असतो की आपण कविता करू शकत नाही. फार वर्षापूर्वी माझा सुद्धा हाच ग्रह होता. मी कोणी कवयित्री नाही परंतु वेबसाईटच्या नावाप्रमाणेच मनातलं कागदावर उतरवण्याचा प्रयत्न जरुर करत असते.
आपल्याला एखाद्या व्यक्तीसाठी किंवा आपली एखादी भावना रेखाटण्यासाठी कविता लिहावी वाटते परंतु आपण कविता लिहिण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे आपल्या मनातील भावना तशाच दबल्या किंवा दडपल्या जातात. खरे सांगायचे झाले तर कविता आपली चांगली मैत्रीण असते जीवलग सखी असते. कविता आयुष्यभर साथ देते एखाद्या मैत्रीणी प्रमाणे. असे मानले जाते की, कविता म्हणजे कवीने अनुभवलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब हे त्यांच्या कवितेमध्ये उमटत असते. 
जनस्थान पुरस्कार विजेते कविवर्य नारायण सुर्वे यांच्या मते, ” कवी, वाचक व वास्तव यांच्यातील संघर्ष कवितेमध्ये बांधील असतो “. कविवर्य नारायण सुर्वे म्हणतात की, ” चार ओळीच्या मागे कविता हा एक लहानसा जीव असतो आणि त्या जीवावर शकडो वर्षे लोक बोलत राहतात कारण त्या कवितेमध्ये शब्दांची ताकत, अर्थाची ताकत अफाट असते “. ( स्त्रोत: सह्याद्री वाहिनी कार्यक्रम )
How to write Marathi Kavita? | How to create Marathi Kavita ?

खाली दिलेल्या मुद्दा च्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करू :

१) संवेदनशीलता
२) सजगपणा
३) वाचन
४) कवितेतील बोध आणि अर्थपुर्णता

१) संवेदनशीलता : 

तुम्हाला जर कविता लेखन करायचे असेल तर तुमच्या अंगी संवेदनशीलता असणे खुप गरजेचे आहे. दुसऱ्याचे दु:ख, एखाद्या व्यक्तीला किंवा समाजातील इतर घटकांना समजून घेणे खुप आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या मते संवेदनशीलता अंगी असणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ खालील कविता वाचा :

२) सजगपणा ( सजगपणा म्हणजे सावधपणा ) : 

कविता लेखनासाठी सजगपणा खुप महत्त्वाचा आहे . तुम्ही समाजामध्ये सजग वृत्तीने वागले पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे याचे ज्ञान असणे खुप आवश्यक आहे. स्व:प्रति आपण जागृत असणे आवश्यक आहे. स्वतःमध्ये कोणत्या भावना जागृत होत आहेत याचे चिंतन केले पाहिजे. ( सजग वृत्ती आत्मसात करण्यासाठी तुम्ही ध्यान[meditation] करु शकता. )
तुम्ही संवेदनशीलतासजगपणा आत्मसात केला की नक्कीच सुंदर मराठी कविता लिहु शकता.

उदाहरणार्थ खालील कविता वाचा :
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता 

३) वाचन : 

उत्तम मराठी कविताचे लेखन करण्यासाठी तुम्ही वाचन करणे आवश्यक आहे. तुम्हाला वाचनाची गोडी निर्माण करावी लागेल. जेवढे तुम्ही नियमितपणे वाचन करतील तेवढाच तुमचा शब्दसाठा व तुमचे ज्ञानभांडार वाढेल. तुम्ही नवनवीन शब्द आत्मसात करतील व स्वत:च्या भावनांची योग्य रितीने कागदावर मांडणी करतील.
तुम्ही जर विद्यार्थी दशेत असाल इतर माध्यमातून शालेय धडे घेत असाल ( उदा. इंग्रजी ) तर तुम्हाला मराठी विषयाचे वाचन करणे अतिआवश्यक आहे. तुम्ही नियमितपणे पेपरचे वाचन करू शकता त्यामुळे तुम्ही समाजाशी जोडले जातील व शब्दसाठा सुध्दा वाढण्यास मदत होईल, तसेच तुम्ही गोष्टीच्या पुस्तकांचे वाचन करू शकता, कवितांची पुस्तके वाचून समजून घेऊ शकता.

उदाहरणार्थ खालील कविता वाचा :
कविवर्य नागराज मंजुळे यांच्या कविता

 

४) कवितेतील बोध आणि अर्थपुर्णता

कविता लिहीताना यमकांचा विचार करत लेखनी थांबवू नका. तुमच्या भावनांना न्याय द्या. या भावनाच तुमच्या एकाएका शब्दाचा शृंखला तयार करतील फक्त आपले चिंतन एकाग्रतेने लेखनीवर राहु द्या. भावनांना विचारांची जोड द्या. आपले विचार प्रभावशाली बनवा. विचारशील बना. त्यासाठी भरपूर पुस्तके वाचा ज्ञान प्राप्त करा.
कवितेला अर्थपूर्ण बनवा. त्यामधून वाचकांना बोध प्राप्त झाला पाहिजे. त्यामधून नवीन विचार प्रकट झाले पाहिजेत. एका कवितेमध्ये खुप ताकत असते आणि एक कविताच एक उत्तम समाज घडवत असते.

उदाहरणार्थ खालील कविता वाचा :
कविवर्य नागराज मंजुळे यांच्या कविता

मला आशा आहे की तुम्ही हे सर्व मुद्दे आचरणात आणतील व खुप सुंदर कविता लिहितील व कवितांच्या आधारे एक उत्तम समाज घडवतील. तुमच्या येणाऱ्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा… धन्यवाद !!!
 
मी लिहिलेली मराठी कविता वाचू शकता:

 

1 thought on “How to write Marathi Kavita?”

  1. अनामित

    तुम्ही खूप चांगले लिहले आहे.. मी देखील या टिप्स लक्षात ठेवेन. धान्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top